बार्शी – तालुक्यातील उपदेश दुमाला येथील वखारिया विद्यालयात रक्षाबंधन उत्सव मुख्याध्यापक दयानंद रेवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. प्रशालेतील सर्व मुलींनी आपल्या भावांचे औक्षण करुन त्यांना राखी बांधली व साखर खाऊ घालून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या उपक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनींनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.
रक्षाबंधनानिमित्त मुलांनी आपल्या बहिणींसाठी पेन, पेन्सिल, वही आदी शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, बंधुभाव, सांस्कृतिक व सामाजिक मूल्याचे महत्त्व विशद होते. भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, स्नेह आणि परस्पर सहकार्याचा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व समजावून सांगून मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख रमेश लंकेश्वर यांनी कार्यक्रमाची रुपरेषा ठरवून नियोजन केले. तसेच रुकसाना बागवान यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.
भारतीय संस्कृती व परंपराची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी दत्तात्रय राऊत, डॉ. प्रशांत काशीद, अनिल वैद्य, मकरंद जगदाळे, रेवणसिद्ध दुलंगे, यश पवार उपस्थित होते.
Post Views: 38