अक्कलकोट – रामाची भक्ती करा रामाचे सेवक व्हा ! राम गावा राम घ्यावा राम द्यावा राम सर्वार्थाने आदर्श आहेत. लोकानां विसावा राहिला नाही जगात सर्व ठिकाणी अस्थिरता आहे . मुळ स्वरूपात आल पाहिजे…. स्व स्वरूपात एकरूप झाले पाहिजे .
राम द्यावा , राम घ्यावा , राम जीवाचा विसावा.. यावर पुर्वाधात किर्तनात निरूपण करून रामाची महती ह भ प. गणेशबुवा गाडगीळ (कल्याण )यांनी विशद केली
वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर येथे समर्थ च्या १४ ८ व्या पुण्यतिथी निमित्य आयोजित धर्म संकीर्तन महोत्सवात ५ वे पुष्प गुंफताना ह.भ.प . गणेशबुवा गाडगीळ यांनी हरिकीर्तनाची सेवा स्वामी चरणी सादर केली .
i संत सुरदास संत तुलसीदास यांची कथा पंढरीची महती विशद करताना जेव्हा चराचर नव्हते आधी रचिली पंढरी चे महत्व सांगितले . काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ‘ पंढरी चे महत्व विशद केले . छत्र सिंहासनी शोभते आयोध्या चा राजा रामाची महती सांगताना हभप . गाडगीळ यांनी गोंदवलेकर महाराज यांची कथा सांगून जिवनातील रामाच महत्व सांगून रामाची भक्ती करण्याचा संदेश दिला .
ह.भ.प . गणेशबुवा गाडगीळ यांचा पुष्पहार घालुन सत्कार वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मंदिर समिती च्या वतीने मनोज जाधव यांच्या हस्ते करण्यात आला .
या प्रसंगी वरवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे , सचिव आत्माराम घाटगे विश्वत महेश गोगी उज्वलाताई सरदेशमुख , प्रथमेश इंगळे , प्रा शिवशरण अचलेर , प्रसाद पाटील , श्रीशैल गंवडी , मनोज जाधव ‘ ऋषी लोणारी ,स्वामी लोणारी : काशीनाथ इंडे , बाळासाहेब कुलकर्णी राजु भोसले ‘ महादेव तेली , लक्ष्मण पाटील , प्रसाद सोनार , अशोक कडगंची , ओंकार पाठक , अक्षय सरदेशमुख ‘ गिरिष पवार , संजय पवार ‘ रमेश शिंदे ‘ सुनिल पवार , बाळासाहेब एकबोटे ‘ माणिक माशाळ ज्ञानेश्वर भोसले ‘ आदि भक्त गण उपस्थित होते .





















