
सोलापूर : सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसीच्या २०२६–२७ या वर्षासाठी रो. नरसिम्हा कनकी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्यासोबत रो. श्रीनिवास नंदाल सचिव, रो. नरहरी कौकुंटला खजिनदार आणि रो. काशीनाथ कुंटला प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.
नवीन संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा शुक्रवार, दि. १० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी येथील पीडीएफ हॉलमध्ये होणार असून, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. जयेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसीने गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य शिबिरे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, श्रमिकांच्या वस्तीतील विद्यार्थ्यांना कारमधून शैक्षणिक सहल, बौद्धिक व्याख्यानमाला, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन तसेच विविध समाजोपयोगी प्रकल्प यशस्वीपणे राबविले आहेत. नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली सेवाभावी उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


















