सोलापूर – शहरातील सोन्या मारुती चौकातील सोन्या मारुती गणेशोत्सव युवक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक सोन्या मारुती चौकातील कार्यालयात मंडळाचे मार्गदर्शक विनायक महिंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली या बैठकीत 2026 27 च्या उत्सवअध्यक्षपदी सागर हावले तर कार्याध्यक्षपदी सागर बडवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
निवड मंडळाचे विश्वस्त सल्लागारांच्या सर्वानुमते या निवडी करण्यात आल्या. उपाध्यक्षपदी रोहन महिंद्रकर, यश गर्जे, खजिनदार अभिषेक रंपुरे, संघटक सुहास महिंद्रकर, सचिव जितेंद्र टेंभुर्णीकर, सहसचिव रोहित उत्तरकर, मिरवणूक प्रमुख महेश वाले, जैनुद्दीन शेख, राजू कुरेशी, प्रसिद्धी प्रमुख शिवानंद येरटे, वर्गणी प्रमुख विनायक महिंद्रकर, प्रसाद कुमठेकर, केदार सोहनी, नंदकुमार कुमठेकर, रिदम देशपांडे, पूजा समिती यश काखंडकी,ओंकार वाले, श्रीराज महिंद्रकर यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी मंडळाचे सल्लागार विलासराव महिंद्रकर, चंद्रकांत सोहनी, राम तडवळकर, अशोक महिंद्रकर, अरुण महिंद्रकर, राजाभाऊ इंडे यांची उपस्थिती होती.

























