सांगोला – मेथवडे (ता.सांगोला) येथील सह्याद्री फार्मसी महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी गोवा मधील नामांकित आंतरराष्ट्रीय फायझर फार्मा एलटीडी व ब्ल्यू क्रॉस लॅब या औषधनिर्माण कंपनीस भेटी दिल्या. या कंपन्या औषधे भारतासह संपूर्ण जगात निर्यात करतात. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना रिसर्च अँड डेव्हलपमेंट, फॉर्मुलेषण अँड डेव्हलपमेंट, प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी आशुरन्स, लेबलिंग, पॅकिंग, स्टोरेज याबद्दल व त्यांची कार्यप्रणाली याविषयी तसेच कंपनीत विविध औषधे कशी तयार केली जातात व त्यासाठी लागणारे यंत्रे, उपकरणे यांची माहिती दिली. अमेरिका, यूरोपीय देश व इतर देशांना औषधे निर्यात करण्यासाठी असणारे नियम, डॉक्युमेंटेशन, टेकनॉलॉजि याबद्दल सर्व माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या विविध शंकाचे निरसन केले. याप्रसंगी महाविद्यालयातर्फे फायझर फार्मा गोवा प्लांटचे असिस्टंट मॅनेजर अभिषेक मोटगी व एच आर मॅनेजर बोरकर सर तसेच ब्ल्यू क्रॉस लॅब, गोवाचे डेप्युटी जनरल मॅनेजर निलेश आमोणकर व एच आर मॅनेजर धाणेश सिंग यांचा सन्मान करण्यात आला. अशा नामांकित जागतिक दर्जाच्या फार्मा कंपनीस भेटी दिल्यामुळे आम्हास भरपूर ज्ञान व माहिती मिळाली असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे आभार मानले. सदर कंपनी भेट यशस्वी करण्यासाठी संस्था विश्वस्त विश्वजीत इंगवले, प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील, ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रा.एस.एस.काळे, प्रा.एस.पी.जोकार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.ए.एस.काळे, प्रा.एस.एम.पवार, पी.एस.पाटील, विश्वजीत पवार, आशिष गव्हाणे यांनी परिश्रम घेतले.