Saturday, April 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संत ज्ञानेश्वर माऊलींचा रथ पालखी सोहळ्यासाठी सज्ज; थाटामाटात निघणार वारीला

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 19, 2024
in maharashtra
0
संत ज्ञानेश्वर माऊलींचा रथ पालखी सोहळ्यासाठी सज्ज; थाटामाटात निघणार वारीला
0
SHARES
59
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देहू आणि आळंदी नागरी पुन्हा सज्ज झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा चांदीचा रथ पालखी सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे. या रथाची संपूर्ण डागडुजी, चांदीचं पॉलिश करण्यात आलं आहे. सुमारे 500 किलोमीटरचा प्रवास हा रथ करणार आहे. या चांदीच्या रथाची सर्व तपासणी करण्यात आली असून पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. माऊलींच्या रथाचे सर्व पार्टस, ब्रेक लायनर, रथ ओढण्याची क्षमता, रथातील लाईट, योग्य सर्व्हिसिंग केल्याची तपासणी करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा 29 जूनला पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. आता अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आळंदीत देखील पालखी सोहळ्यासाठीची लगबग पाहायला मिळत आहे. आळंदीतील दुकानांमध्ये फुलांच्या माळा सजल्याचं दिसत आहे. तसेच तुळशीहार माळांनी देखील सर्व दुकानं फुलून गेली आहेत.

एका गावातून 40 पेक्षा अधिक भाविक असल्यास गावातून थेट एसटी
सालाबाद प्रमाणे श्री श्रेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी येतात. अनेक प्रवाशी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींसोबत चालत दिंडीने येतात. या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. 40 पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सरकारचा मोठा निर्णय
यंदा शासनाने पालखी सोहळ्यातील दिंड्यांना 20 हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील वारकरी संप्रदायाला खुश करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत वारकरी संप्रदायाने केलं होतं. त्यानंतर आता दुसरा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता आषाढीच्या शासकीय महापूजेस 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना निमंत्रण दिलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यात्मिक आघाडी प्रमुख अक्षय महाराज भोसले यांनी यासाठी पाठपुरावा केल्याने पुन्हा एकदा महायुतीत शिंदे शिवसेनेला मोठा फायदा मिळणार आहे.

वारकरी सांप्रदाय खुश
आता विठ्ठलाचा गाभारा आणि सोळखांबी मध्ये ही वाढलेली मानकऱ्यांची संख्या कशी मावणार हा प्रश्न देखील पडणार आहे. दरम्यान, शासनाने आषाढी वारीसाठी सोहळ्यात चालणाऱ्या सुमारे 1500 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाचं राज्यातील दिंडी प्रमुखांनी स्वागत केलं.

Post Views: 29
Previous Post

तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अजित पवार – पहिल्यांदाच भाजपला थेट इशारा

Next Post

सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड

सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड

ताज्या बातम्या

डॉ. सतीश कोपूरवाड यांनी स्वीकारला जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार

डॉ. सतीश कोपूरवाड यांनी स्वीकारला जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार

April 25, 2026
जव्हेरी ॲडव्हर्टायझिंग ग्रुपचे प्रमुख संचालक संदीप जव्हेरी यांचे निधन

जव्हेरी ॲडव्हर्टायझिंग ग्रुपचे प्रमुख संचालक संदीप जव्हेरी यांचे निधन

April 25, 2026
मौजे कान्हापुरी येथे पोहचले निर्भया पथक 

मौजे कान्हापुरी येथे पोहचले निर्भया पथक 

April 25, 2026
इनामदार गुरुजी पुण्यतिथीनिमित्त रविवारी गुलाल कार्यक्रम

इनामदार गुरुजी पुण्यतिथीनिमित्त रविवारी गुलाल कार्यक्रम

April 25, 2026
स्वतःला ‘बाळुमामाचा अवतार’ म्हणवणाऱ्या मनोहर भोसलेला अटक

स्वतःला ‘बाळुमामाचा अवतार’ म्हणवणाऱ्या मनोहर भोसलेला अटक

April 25, 2026
कांदलगावात नृसिंह जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ 

कांदलगावात नृसिंह जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ 

April 25, 2026
कंदर परिसरात वादळी वाऱ्याने केळी पिकांचे नुकसान

कंदर परिसरात वादळी वाऱ्याने केळी पिकांचे नुकसान

April 25, 2026
महिला व बालविकास विभागामार्फत पोषण पंधरवडा ची उस्फुर्त सांगता

महिला व बालविकास विभागामार्फत पोषण पंधरवडा ची उस्फुर्त सांगता

April 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0828522

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697