सोलापूर – येथील संभाजीराव शिंदे विद्यामंदिर संकुलातर्फे शिक्षणमहर्षी स्व. विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाने बाजी मारली आहे.
. सोशल मीडिया: जोडलेले जग आणि हरवलेली माणसे’ या विषयावर प्रभावी विचार मांडत ११ वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. वर्षा विजय होनमाने हिने प्रथम, तर ११ वी कला शाखेची कु. पल्लवी गजेंद्र जाधव हिने तृतीय क्रमांक पटकावला.
दोन्ही विजेत्या विद्यार्थिनींना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या यशात त्यांना महाविद्यालयातील प्रा. सविता मादळे व प्रा. गीता मोहोळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
. या यशाबद्दल सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शीला मिस्त्री, उपाध्यक्ष डॉ. राजीव प्रधान, शालेय समिती अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, सचिव सौ. वीणा पतकी, प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी, पर्यवेक्षक प्रा. पद्मकुमार उपाध्ये, प्रा. मधुरा गोगटे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे.
Post Views: 17