जेऊर – वाशिंबे (ता. करमाळा) येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी शंकर निवृत्ती झोळ (वय ६४) यांचे बुधवार, दि. १५ रोजी पहाटे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
शंकर झोळ यांनी पारंपरिक शेतीबरोबरच फळबाग शेतीत विशेष प्रगती साधली होती. त्यांनी आपल्या शेतात डाळिंब,केळी, तसेच इतर फळपिकांची लागवड करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ठिबक सिंचन, योग्य छाटणी पद्धती आणि सेंद्रिय खतांचा वापर करून त्यांनी फळबाग शेतीत आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या मार्गदर्शनामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनीही फळबाग शेतीकडे वळून आर्थिक प्रगती साधली. ते उत्कृष्ट नियोजन, मेहनत आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन यासाठी ओळखले जात होते.
त्यांच्या निधनामुळे वाशिंबे परिसरावर शोककळा पसरली असून, त्यांच्या पार्थिवावर वाशिंबे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.पत्रकार सुयोग झोळ व शैलेश झोळ यांचे ते वडील तर मकाई कारखान्याचे संचालक गणेश झोळ, किशोर झोळ,संग्राम झोळ यांचे चूलते होते.




















