बार्शी – सालाबादप्रमाणे यावर्षीही शिवराज्य सेना पक्षाच्यावतीने बार्शी शहरात श्री शिवराज्याभिषेक दिन उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. शिवराज्य सेनेच्यावतीने गेली १७ वर्षे अखंडपणे हा सोहळा बार्शीनगरीत मोठ्या अभिमानाने आयोजित केला जात आहे.
१८ पगड जातीतील शिवभक्तांच्या हस्ते महाअभिषेक
स्थानिक श्री शिवाजी कॉलेज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ मूर्तीजवळ हा सोहळा पार पडला. यावेळी शिवराज्य सेनेच्यावतीने शिवरायांच्या मूर्तीला पंचामृताने महाअभिषेक घालण्यात आला. विशेष म्हणजे, महाराजांच्या शिवशाहीतील सर्वसमावेशक विचार जपत १८ पगड जातीतील शिवभक्तांच्या हस्ते हा अभिषेक संपन्न झाला. यावेळी उपस्थितांनी दिलेल्या “जय भवानी, जय शिवाजी…” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
या सुवर्णक्षणी नगरसेवक आकाश राऊत, राहुल काळे, निखिल बारसकर, संदीप पाटील, सोमनाथ डमरे, संतोष कोंढरे, संग्राम देशमुख, विवेक भागवत, सौरभ शहा, सुधीर झिंगे, योगेश खजनदार, शैलेश माने, बाळासाहेब आरगडे, बालाजी पंडीत, अभि दाभाडे, सुरज शिंदे, किरण सलगर, भैया आरगडे, सागर पवार यांच्यासह शिवराज्य सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बहुसंख्येने शिवभक्त उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिवभक्तांनी एकत्रितपणे ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र घेतला. त्यानंतर उपस्थित नागरिकांना मिठाई वाटप करुन या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता करण्यात आली.
Post Views: 8