गणेशोत्सवाचे औचित्य साधून केवळ मनोरंजनाला प्राधान्य न देता सामाजिक बांधिलकी जपत मंद्रूप येथील विविध गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी हिंदू स्मशानभूमी व माळी समाज स्मशानभूमी परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. लहान मुलांसह युवकांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.
हिंदू स्मशानभूमीत वाढलेली काटेरी झुडपे व पालापाचोळा हटविण्यात आला. दहनशेडमधील राख झाडांना खत म्हणून वापरण्यात आली, तर जमा झालेला सुमारे दहा गाड्या पालापाचोळा खतनिर्मिती प्रकल्पाकडे वर्ग करण्यात आला.
स्थानिक प्रजातींची वृक्षलागवड करून तिरडीच्या बांबूपासून झाडांना संरक्षण कुंपणही करण्यात आले. विशेष म्हणजे तुरीच्या काड्यांपासून युवकांनी स्वतः खराटे तयार केले होते.
‘रानवेध फाउंडेशन’ व ‘आम्ही मंद्रूपकर’ यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या विधायक उपक्रमाला यंदाही पुढे नेत मानाचा मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर गणेशोत्सव मंडळ (माळी गल्ली) व रिद्धी-सिद्धी गणेशोत्सव तरुण मंडळाने पुढाकार घेतला. माळी समाज स्मशानभूमी स्वच्छतेचे हे सलग पाचवे वर्ष आहे.
या मोहिमेत उमेश हेळकर, प्रशांत जोडमोटे, मिथुन मुगळे, दयानंद ख्याडे, सुरज तळवडे, मल्लु अडोळे, राजु उमदी, संतोष जकुणे, सारंग चोरमुले, राहुल पुजारी, चिदानंद नडविनगळ, शिवा माळी, सागर घाले, सिध्दू मुगळे, मल्लु हेळकर, संतोष घाले, नागेश ख्याडे, बाळू जोडमोटे, निलेश जोडमोटे यांनी सक्रिय सहभाग घेतला. तर, मुख्यबसस्थानक जवळील हिंदू स्मशानभूमी मोहिमेत सुरेश बळ्ळोळे, मल्लिकार्जुन शिळ्ळे, कुमार जोडमोटे, महेश उंबरजे, प्रदीप जकुणे, समर्थ कुलकर्णी, आकाश मेंडगुदले, बसवराज जोडमोटे, प्रितम देशपांडे, राजू बळ्ळोळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तरुणांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
Post Views: 15