सोलापूर – श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय गणेश-उत्सव व्याख्यानमालेत
प्रारंभी श्रींचे पूजन ग्रामीण विद्या विकास विद्यालयाचे ज्येष्ठ प्रा. मल्लिनाथ माणकोजी, प्राचार्य सुधीर सोनकवडे व उपस्थित सर्व शिक्षक वृंदांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी मार्गदर्शन करतांना प्रा.माणकोजी यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषा व आरोग्य या विषयावर आपले विचार मांडले हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा आहे. या भाषेची संवर्धन करण्याची आपल्या सर्वांची प्राथमिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. त्याचबरोबर हिंदी भाषा भाषेतील कबीर के दोहे मनोरंजनात्मक भाषाशैली व उत्पत्ती भाषेचा विस्तार यावर सविस्तर असे भाष्य केले.
त्याचबरोबर मानवी आरोग्य समस्या, योगासन, योगासनाचे फायदे, विद्यार्थी जीवनातील योगासन याबद्दल मार्गदर्शन करताना मोबाईल मुळे माहिती मिळते पुस्तकाने ज्ञान मिळते, ‘चिता जलने से पहले चिंतन करना चाहिये ‘ आरोग्य धनसंपदा, शरीराचे सौंदर्य व्यायाम व कष्टाने प्राप्त होते. प्राणायामाने मन व हृदय सुदृढ होते. ‘मन शुद्ध तर शरीर शुद्ध’ योग करा रोगाला पळवा असे अनेक उदाहरणासह आरोग्य विषयी सखोल माहिती देऊन योगासन करून निरोगी जीवन जगण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुधीर सोनकवडे यांनी केले .यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेश पट्टणशेट्टी यांनी मानले.
Post Views: 15