Saturday, September 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूरला आंबेडकरी विचारांचा समृद्ध वारसा लाभला 

तरुण भारतbyतरुण भारत
November 29, 2025
in solapur
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने सोलापूर नगरी क्रांती प्रवण झाली आहे. आंबेडकरी विचारांचा समृद्ध आणि जाज्वल्य वारसा सोलापूर शहर – जिल्ह्याला लाभला आहे. चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथात लेखक दत्ता गायकवाड यांनी डॉ. आंबेडकर यांचा सोलापूरची ऋणानुबंध, त्यांचा त्याग आणि त्यांच्या समवेतचा माता रमाई यांचा प्रवास अभ्यास पूर्णपणे मांडला आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी येथे केले.

          चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक, जेष्ठ अभ्यासक दत्ता गायकवाड यांचा सन्मान सोहळा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते फॉरेस्ट येथे थाटात पार पडला. यावेळी विचारमंचावर प्रा. एम. आर. कांबळे , महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे, समारंभाचे संयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, किसन जाधव, शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

         यावेळी सन्मानचिन्ह शाल , निळी टोपी, उपरणे आणि पुष्पगुच्छ देऊन लेखक गायकवाड यांचा यथोचित गौरव करण्यात आला. प्रारंभी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अंजना गायकवाड यांनी केले.

       अण्णासाहेब बनसोडे पुढे म्हणाले, लेखक दत्ता गायकवाड यांनी आपल्या ग्रंथामध्ये डॉ. आंबेडकर यांचा ऋणानुबंध संशोधन आणि अभ्यास पूर्णपणे मांडला आहे. डॉ. आंबेडकरांचे कार्य त्याचबरोबर त्यांच्यासमवेत सोलापुरातील माता रमाई यांचा प्रवास अंतर्भूत केला आहे. तो एक ऐतिहासिक दस्तावेज ठरणार आहे. 85 वर्षीय या लेखकाची वाचन आणि लेखनाची भूक मोठी आहे. याचा अभिमान वाटतो.

      याप्रसंगी माजी नगरसेवक गणेश पुजारी, डि.के बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे, दिनेश शिंदे, दिपाली लोंढे, सूर्यमणि गायकवाड, सुधीर चंदनशिवे, पुरुषोत्तम कसबेकर, अरविंद शेंमाडे,

श्रीमंत जाधव, चाचा सोनवणे, वैभव गंगणे, प्रेमानंद लोंढे, राज कांबळे, निवृत्त पोलीस उपायुक्त बाळासाहेब सरवदे, प्रणव लोंढे, चंद्रमणी कांबळे, राजू काटे, दीक्षांत सरवदे, करुणा शेमाडे यांच्यासह पदाधिकारी , परिसरातील महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंबेडकरी चळवळीतील सोलापुरातील पहिला आमदार फॉरेस्ट येथीलच : चंदनशिवे

प्रस्ताविक भाषणात आनंद चंदनशिवे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि चळवळीचा संपूर्ण इतिहास साहित्यिक दत्ता गायकवाड यांनी ग्रंथरूपात सर्वांना सादर केला आहे. त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. फॉरेस्ट येथील गंगा निवास येथे डॉ. आंबेडकर यांनी वास्तव्य केले होते. इथूनच स्वतंत्र मजूर पक्षाचे जिवाप्पा ऐदाळे हे सोलापुरातून पहिले आमदार म्हणून निवडून आले होते. आंबेडकरी चळवळीत योगदान देणाऱ्याचा सन्मान हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तो सोहळा फॉरेस्ट येथेच होत असल्याचा अभिमान वाटतो, असे आनंद चंदनशिवे म्हणाले.

पुण्यातील डॉ. आंबेडकरांचे ऋणानुबंध यावर गायकवाड यांनी ग्रंथ लिहावा : बनसोडे 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अनेक वेळा पुण्याला आले होते. इथे त्यांचे वास्तव्य होते. पुण्यातील ऋणानुबंधासंदर्भात आम्ही माहिती देऊ, त्या आधारे लेखक दत्ता गायकवाड यांनी त्यावर ग्रंथ लिहावा. यामुळे महाराष्ट्रातील जनतेला आनंद होईल, अशी अपेक्षा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी व्यक्त केली.

Post Views: 142
Previous Post

एन. के. किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांची कृषी पर्यटन सहल उत्साहात

Next Post

रक्तदान हे अत्यंत महत्त्वाचे पुण्यकर्म आहे – स्वामी सौम्यानंदजी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रक्तदान हे अत्यंत महत्त्वाचे पुण्यकर्म आहे - स्वामी सौम्यानंदजी

ताज्या बातम्या

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

बार्शीतील दोघांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

September 19, 2026
श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

September 19, 2026
 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

September 19, 2026

बार्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना तातडीची मदत व कर्जमाफी द्या, शिवसेनेची मागणी

September 19, 2026

गौरी गणपती आरासमध्ये लावले पोलीसांच्या कार्याचे संदेश देणारे फलक

September 19, 2026
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1233766

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!