Monday, May 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महिला कुस्ती क्षेत्रातील सोलापूरची आशा; कुस्तीपटू आश्लेषा बागडेचे ऑलम्पिक पदक जिंकणे हेच ध्येय

तरुण भारतbyतरुण भारत
April 2, 2026
in editor
0
महिला कुस्ती क्षेत्रातील सोलापूरची आशा; कुस्तीपटू आश्लेषा बागडेचे ऑलम्पिक पदक जिंकणे हेच ध्येय
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जेऊर – करमाळा तालुक्यातील अंजनडोह सारख्या ग्रामीण भागात जन्माला आलेली कुस्तीपटू आश्लेषा कल्याण बागडेचे कुस्ती क्षेत्रातील यश सर्वांना अचंबित करणारे आहे.

तिने आजपर्यंत राज्य व नॅशनल सह आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्जवल केले आहे.मात्र या युवा व गुणी खेळाडूकडे शासनाने किंवा एखाद्या संस्थेचे लक्ष न जाणे ही खरी शोकांतिका आहे.

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी तिला कुस्ती खेळाची आवड लागली.एका शाळेत कबड्डीच्या संघात प्रवेश न मिळाल्याने जिद्दीने पेटलेल्या आश्लेषाला मैदानावर आपलं कोशल्य दाखवून द्यायचे होते.त्यामुळे सुरवातीला गावातील भैरवनाथ कारखान्यातीळ तालमीत सराव व नंतर पुण्याच्या आळंदीला मार्गदर्शक गुंड सरांच्या तालमीत तिने सर्व केला. व कुस्ती क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या घरात कुस्तीची परंपरा नाही.चुलते गाव पातळीवर कुस्ती खेळत होते पण मर्यादित स्वरूपात. 

तिचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण तर महाविद्यालयीन शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी पूर्ण झाले.

अकरावी बारावी झाल्यानंतर कुमारी आश्लेषा ही सराव करण्यासाठी आळंदीच्या कुस्ती संकुल मध्ये दाखल झाली तेथे मार्गदर्शक गुंड सरांनी तिचे कौशल्य हेरून तिला योग्य मार्गदर्शन केले.सध्या ती बीएच्या तिसऱ्या वर्षाला आहे.

2024-25 च्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आयोजित कुस्ती स्पर्धेत तिने उत्तम कामगिरी करून दाखवली त्यामुळेच अनेक कुस्ती अभ्यासकांच्या नजरेत ती बसली. वेगवेगळ्या ठिकाणी कुस्त्यांचे प्रेक्षणीय प्रदर्शन केल्यामुळे नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तिची निवड झाली. तिने तेथेही उत्तम कामगिरी करून दाखवली.दरम्यान मंगळवेढा केसरी हा बहुमान तिने मिळवला आहे.केंद्रीय कुस्तीगीर संघाने अनेक कुस्त्यांच्या फेऱ्या पूर्ण केल्यानंतर तिची कझाकीस्थान येथे भरलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड केली.तिने तेथे 59 किलो वजनी गटामध्ये देशासाठी एक पदक जिंकले मात्र जिल्हा व राज्य पातळीवर म्हणावे तसे तिचे विशेष कौतुक झाले नाही तिला या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कोणतीही संस्था अथवा शासनामार्फत मदतीचा हात दिला गेला नाही

सीनियर नॅशनल स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पदक आवश्यक होते सोलापूर जिल्ह्याकडे आंतरराष्ट्रीय पदक जिंकणारी महिला कुस्तीपटू नसल्याने जिल्हा सीनियर नॅशनल स्पर्धा खेळू शकत नव्हता आश्लेषाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकल्याने सीनियर नॅशनल स्पर्धेसाठी जिल्ह्याला संधी मिळवून देणारी सोलापूरची ती पहिली महिला पैलवान ठरली आहे.

महाराष्ट्र केसरीच्या चारही स्पर्धेत तिने गोल्ड मेडल मिळवले आहे आत्ताच झालेल्या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातून पदक मिळवणारे महिला महाराष्ट्र केसरीतील ती एकमेव खेळाडू आहे

कुस्तीसाठी होणारा तिचा सर्व खर्च कुटुंब स्वतः करते  खर्चाचा बोज सध्या अवघड होत आहे. मध्यंतरी कर्नाटक राज्यातील जिंदल कंपनीने तिला कंपनीमार्फत तेथे बोलून सुविधा देण्याचे जाहीर केले मात्र तेथे सराव व्यवस्थित होत नसल्याने तिने कर्नाटक राज्य जिंदल कंपनी सोडून दिली.

Post Views: 124
Previous Post

चिखलठाणच्या कोटलींग देवाच्या यात्रेला सुरुवात

Next Post

रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या समाधीस्थळी जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या समाधीस्थळी जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार

रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या समाधीस्थळी जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार

ताज्या बातम्या

पालकांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधावा – प्रशांत माने

May 25, 2026

हम कमिशनर है म्हणणाऱ्या रीलवाल्याचा पोलिसांनी उतरवला माज

May 24, 2026

आरक्षणावर सडेतोड बोलले ओबीसी नेते हाके

May 24, 2026

नाभिक समाजाच्या पुढाकारातून दोन गरीब दाम्पत्याच्या जुळल्या रेशीमगाठी

May 23, 2026

निकाळजेंच्या घरी सांत्वनासाठी पोहोचल्या खा प्रणिती शिंदे

May 23, 2026

श्री शक्ती सेवा समिती सोलापूरच्या वतीने ऐश्वर्या लक्ष्मी सुवर्ण कुबेर महोत्सवात सुवासिनींने केले पूज

May 23, 2026

काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचे निधन

May 23, 2026

अप्रिय घटना नको, त्वरित पोलिसांना संपर्क साधा ईदसाठी सूचना

May 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0877732

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697