Tuesday, September 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या समाधीस्थळी जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार

तरुण भारतbyतरुण भारत
April 2, 2026
in editor
0
रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या समाधीस्थळी जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना :  रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या संगम माहुली (ता. सातारा) येथील समाधीस्थळी जागतिक दर्जाचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून, त्यासाठी तातडीने आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी दिले आहेत. या स्मारकासाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे आणि मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक डॉ संजय लाखेपाटील,सातारा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख अंकुश कदम, करण गायकर, रघुनाथ चित्रे, राहुल डिघोळे, शरद देशमुख तसेच प्राचार्य मोरे आदींनी उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी ताराराणी यांच्या समाधीची सद्यस्थिती व ऐतिहासिक वारशाच्या जतनासंदर्भातील मुद्दे मांडण्यात आले. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पर्यटनमंत्री शंभुराजे देसाई यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती डॉ संजय लाखेपाटील यांनी दिली असून तज्ज्ञ इतिहासकार व वास्तुविशारदांची समिती स्थापन करून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात यावा, असेही सांगण्यात आले.

सदर प्रस्तावानुसार संगम माहुली येथील परिसराचा विकास रणरागिणी छत्रपती ताराराणी व मराठेशाहीच्या शौर्यगाथेचे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून करण्याचा मानस आहे. तसेच ताराराणी यांच्या कार्याचा सखोल अभ्यास व्हावा यासाठी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात स्वतंत्र अभ्यासकेंद्र स्थापन करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. याशिवाय शालेय व उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कार्याचा समावेश करणे, मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना त्यांचे नाव देणे, तसेच त्यांच्या सन्मानार्थ पुतळा उभारणे अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

स्मारक उभारणीसाठी सुमारे १५० ते २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, अनुभवी वास्तुविशारदांकडून आराखडा तयार करण्यासाठी राजेंद्र कोंडले यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच या सर्व विषयांवर पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे हे लवकरच संगम माहुली येथे भेट देऊन समाधीस्थळाची पाहणी करणार असल्याची माहितीही डॉ संजय लाखेपाटील यांनी दिली  आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या कामास गती देण्यासाठीही संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या निर्णयामुळे इतिहासप्रेमी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या कार्याला योग्य तो मान मिळण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Post Views: 167
Previous Post

महिला कुस्ती क्षेत्रातील सोलापूरची आशा; कुस्तीपटू आश्लेषा बागडेचे ऑलम्पिक पदक जिंकणे हेच ध्येय

Next Post

हनुमान जयंती निमित्त शहरात ५५ हुन अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
हनुमान जयंती निमित्त शहरात ५५ हुन अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजन

हनुमान जयंती निमित्त शहरात ५५ हुन अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजन

ताज्या बातम्या

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

September 14, 2026
देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

September 14, 2026
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

September 14, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026

आजोबा गणपतीचे थाटात झाले पूजन ….#viral #solapurnews #aajsolapur #latestnews #maazsolapur

September 14, 2026

अज्ञात कारणावरुन कोरफळे येथे महिलेची आत्महत्या

September 14, 2026

अलीपूर येथून २६ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

September 14, 2026

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे शोषण

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1208321

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!