सोलापूर – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त शिवसेना शाखा प्रभाग क्रमांक पाच वसंत विहार च्यावतीने महिलांसाठी एसटीच्या सवलतीचे पास काढण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी 250 महिलांचे पास काढून त्याचे वितरण जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण महानगर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले या उपक्रमाचे महिला वर्गातून स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी विधानसभा संघटक सुरेश जगताप, शहर उपप्रमुख आबा सावंत, जिल्हा संघटिका मंगल थोरात, शहर संघटिका स्वाती रुपनर, शाखाप्रमुख राहुल परदेशी, मारुती खानापुरे, मंगेश क्षीरसागर व कार्यकर्ते उपस्थित होते.
























