सोलापूर- नवोदित चित्रकार स्नेहल नारायणकर व गोरख निंबाळकर यांच्या आर्ट व्हेंचर चित्रप्रदर्शनाचे उदघाटन पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
डफरीन चौकातील पु. ना. गाडगीळ येथे आयोजित या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, नगरसेवक रमेश व्हटकर, मनोहर नारायणकर, चित्रकार नितीन खिलारे, जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले, राज्य सचिव शांतप्पा काळे यांची उपस्थिती होती.
पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे जितेंद्र जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमास सिद्धाराम नालवार, शांताराम शिंदे, वर्षा निरंजन यांचे सहकार्य लाभले. संतोष धारेराव यांनी सूत्रसंचालन केले.
























