टेंभूर्णी – मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने फुटजवळगाव (ता. माढा, जि. सोलापूर) येथील ७० वर्षीय हनुमंत कोळेकर यांना महत्त्वाचा दिलासा देत त्यांची शिक्षा स्थगित करून जामीन मंजूर केला आहे. क्रिमिनल अपील क्रमांक १३९१/२०२४ मधील अंतरिम अर्ज क्रमांक ५१८५/२०२४ वर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला.
बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेल्या दोषसिद्धीच्या निर्णयाविरोधात हनुमंत कोळेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात अपील दाखल केले होते. अपीलवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने अर्जदाराच्या बाजूने मांडण्यात आलेले युक्तिवाद विचारात घेत शिक्षा स्थगित करण्याचा (Suspension of Sentence) निर्णय दिला. तसेच अपील प्रलंबित असताना त्यांना जामिनावर मुक्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
या प्रकरणात अर्जदाराच्या वतीने अॅड. ऋषिकेश अजित मोहिते यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना अॅड. युवराज पाटील यांचीही मोलाची साथ लाभली. तसेच अॅड. प्रशांत एडके, अॅड. संजय मासाळ आणि अॅड. धुडदेव मासाळ यांनीही बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी सहकार्य केले.
उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे अपीलवरील अंतिम निर्णय होईपर्यंत हनुमंत कोळेकर यांना जामिनावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या आदेशाकडे कायदे क्षेत्रात महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून पाहिले जात आहे.
Post Views: 5