Saturday, June 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राज्यात दैदिप्यमान यशाचा झंझावात; इयत्ता दहावीच्या निकालात तीन विद्यार्थी राज्यात प्रथम

तरुण भारतbyतरुण भारत
May 11, 2026
in editor
0
राज्यात दैदिप्यमान यशाचा झंझावात; इयत्ता दहावीच्या निकालात तीन विद्यार्थी राज्यात प्रथम
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – ज्ञानाची परंपरा, संस्कारांची श्रीमंती आणि गुणवत्तेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांनी यंदाच्या इयत्ता दहावीच्या निकालात पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूरने अभूतपूर्व यश संपादन करत संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विश्वात पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाचा सुवर्णठसा उमटवला आहे. कवठेकर प्रशाला,पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल या संस्थेच्या शाखांनी यंदाही “गुणवत्ता, संस्कार आणि शिस्त” या त्रिसूत्रीचा तेजस्वी प्रत्यय घडवत दैदिप्यमान यशाची परंपरा अबाधित राखली आहे.

यंदाच्या माध्यमिक शालांत परीक्षेत कवठेकर प्रशालेचे चि.मिहिर मकरंद बडवे आणि चि.रुद्र अभय उत्पात यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, या यशामुळे संपूर्ण पंढरपूर शहर अभिमानाने उजळून निघाले आहे. कवठेकर प्रशालेचा निकाल यंदाही गौरवास्पद ठरला. एकूण २७० विद्यार्थ्यांपैकी तब्बल २६० विद्यार्थी उत्तीर्ण होत प्रशालेने ९६.५० टक्के निकालाची मानाची पताका फडकावली. कु. साक्षी प्रवीदत्त वांगीकर हिने ९७.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर चि. आदित्य आनंद उत्पात याने ९५.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, संस्कृत विषयात चार विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळवत प्रशालेच्या गुणवत्तेच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या २५ विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीची आणि बुद्धिमत्तेची झळाळी दाखवून दिली.

दरम्यान पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूलनेही शंभर टक्के निकालाची उज्ज्वल कामगिरी करत संस्थेच्या यशमालिकेत मानाचा दुवा जोडला. कु. अनुष्का आप्पासाहेब लेंडवे हिने ८६ टक्के गुणांसह प्रथम, कु. मृणाली प्रकाश शिनगारे हिने ८३.८० टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. अनुष्का रणजीत काळुंगे हिने ८३.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
या सर्व शाखांचे हे उज्ज्वल यश म्हणजे केवळ निकालाची आकडेवारी नसून, विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेल्या संस्कारांचे, शिस्तबद्ध शिक्षणपद्धतीचे आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमांचे तेजस्वी फलित आहे. सुमारे ८० वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या या संस्थेने केवळ गुणवंत विद्यार्थीच घडवले नाहीत, तर समाजाभिमुख, संस्कारक्षम आणि कर्तृत्ववान नागरिकांची पिढी घडवण्याचे कार्य सातत्याने केले आहे.

या दैदिप्यमान यशाबद्दल आयोजित गौरव समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष नाना कवठेकर, मानद सचिव सु.र. पटवर्धन, संस्था सदस्य डॉ.मिलिंद जोशी, एस.पी. कुलकर्णी, संजय कुलकर्णी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना मानद सचिव सु.र.पटवर्धन यांनी, “गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अखंड परंपरा अशीच सुरू राहील आणि या प्रशाला राष्ट्रासाठी कर्तृत्ववान नागरिकांची सशक्त पिढी घडवत राहतील,” असा विश्वास व्यक्त केला. संस्थेच्या चेअरमन श्रीमती विणाताई जोशी, अध्यक्ष नानामालक कवठेकर, मानद सचिव सु.र.पटवर्धन, सु.त्री.अभ्यंकर आणि सर्व संस्था सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.वाय.पाटील, पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.मोहोळकर मॅडम यांची शैक्षणिक वाटचाल अत्यंत विश्वासार्ह आणि प्रेरणादायी ठरत आहे. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग तसेच पंढरपूरमधील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण पंढरपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमान, आनंद आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले असून, “संस्कारातून गुणवत्ता आणि गुणवत्तेतून यश” या संस्थेच्या ध्येयवाक्याचा पुन्हा एकदा प्रत्यय सर्वांना आला आहे.

Post Views: 35
Previous Post

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चषक : १९ वर्षाखालील जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा

Next Post

फिजिओथेरपी ही शरीराच्या बाहेरून तर योग हा आतून उपचार करतो : डॉ. संदीप भागवत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
फिजिओथेरपी ही शरीराच्या बाहेरून तर योग हा आतून उपचार करतो : डॉ. संदीप भागवत

फिजिओथेरपी ही शरीराच्या बाहेरून तर योग हा आतून उपचार करतो : डॉ. संदीप भागवत

ताज्या बातम्या

नाईट लँडिंगचे कारण नको विमानसेवा सुरळीत ठेवा – जिल्हाधिकारी #viral #news #solapurnews

June 27, 2026

म्हणून उडत नाहीये सोलापूरातून विमान….. #viral #news #solapurnews

June 27, 2026

केतनचे परिवार भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतला हा निर्णय

June 27, 2026

दोन उड्डाणपुलांच्या भूसंपादनाचा खर्च रु १४५ ११ कोटी #viral #news #solapurnews

June 27, 2026

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आत्मचिंतनाची गरज #news #marathinews

June 27, 2026

टी ई टी परीक्षेचा पेपर फुटला #viral #news #breakingnews

June 27, 2026

भाजप नेत्या मेधा कुलकर्णींनी जे घडलं ते थेट सांगितले….. #viral #marathinews #news

June 27, 2026

दत्त अवतारी स्वामी समर्थांची महिमा व वटवृक्ष देवस्थान समितीचे सेवाकार्य ऐकून भारावलो – न्यायमूर्ती ए.एम.बादर

June 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0942758

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697