वेळापूर – मौजे वेळापूर तालुका माळशिरस येथून श्री ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी पंढरपूरकडे चालत जात असते. पालखी सोहळ्या बरोबर लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत जातात अशावेळी महाराष्ट्र शासन व सोलापूर जिल्हा प्रशासन यांच्याकडून भाविकांच्या सोयीसाठी सर्व सुविधा पुरविण्यात येतात. तसेच पोलीस प्रशासनाकडून देखील चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येऊन भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याबाबत परिपूर्ण दक्षता घेण्यात येते.

याउपरही पालखी सोहळा दरम्यान काही अनुचित प्रकार होऊन भाविकांच्या जीवास धोका निर्माण झाल्यास अथवा काही समाजकंटकाकडून हल्ला झाल्यास त्यांना चोख प्रतिउत्तर देऊन भाविकांची सुरक्षा करण्याकरिता *सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी* यांच्याकडून सुसज्ज यंत्रणा उभी केली आहे . यामध्ये QRT, RCP, BDDS यासारख्या यंत्रणे कडून अशा कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलीस दलाकडील अत्याधुनिक हत्यारासह सज्ज असून असा अनुचित प्रकार घडल्यास त्यावेळी करावयाच्या कार्यवाहीचे मॉक ड्रिल आज वेळापूर येथील पालखीतळावर पार पाडण्यात आले.






















