Friday, September 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डब्ल्यू.आय.टी. जैन मंदिरात  भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव भक्तिभावात

तरुण भारतbyतरुण भारत
March 31, 2026
in editor
0
डब्ल्यू.आय.टी. जैन मंदिरात  भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव भक्तिभावात
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जैन धर्मातील अहिंसा, सत्य, अपरिग्रह आणि करुणा या सार्वकालिक मूल्यांचा जागर करणारा भगवान महावीर स्वामी यांचा २६२५ वा जन्मकल्याणक महोत्सव वालचंद शिक्षण समूहातील डब्ल्यू.आय.टी. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील जैन मंदिरात अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यात्म, संस्कार आणि शिस्त यांचा सुंदर संगम अनुभवणारा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

पहाटेपासूनच मंदिर परिसरात विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. भगवान महावीरांच्या मूर्तीचे प्रक्षाल करून विधिवत पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंत्रोच्चारांच्या मंगलध्वनीत केसरी पंचा व धोतर परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी साकारलेले वातावरण भक्तिरसाने भारलेले होते. मंदिर ध्वजारोहणानंतर पालखीमध्ये भगवानाची मूर्ती प्रतिष्ठापित करून भजन-कीर्तनाच्या तालावर पदयात्रा काढण्यात आली. संपूर्ण परिसर ‘अहिंसा परमो धर्मः’ या संदेशाने दुमदुमून गेला.

सकाळी ६.४० वाजता वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी यांनी सौ. माया गांधी यांच्या सह ध्वजारोहण करून महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी विश्वस्त भूषण शहा, पृथ्वीराज गांधी, सौ. संगीता गांधी, वैभव गांधी, पराग शहा यांच्यासह प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर प्रभातफेरी व भव्य शोभायात्रा (पालखी) काढण्यात आली. महाविद्यालय परिसर प्रदक्षिणा घालून पुन्हा मंदिरात येत पालखी विसर्जित करण्यात आली.

या महोत्सवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या धार्मिक झांकी विशेष आकर्षण ठरल्या. पाच पापे आणि त्यांच्या परिणामांचे चित्रमय दर्शन घडविणाऱ्या रेखाटन टप्प्यापासून ते नरकदर्शनाद्वारे पापांचे भयावह परिणाम प्रभावीपणे उलगडण्यात आले. दुसऱ्या टप्प्यांत कुंडलपूर मंदिराचे दर्शन, तसेच त्रिलोक आणि चार गतींचे सखोल चित्रण सादर करण्यात आले. जीवनातील दु:खाचे मूळ आणि त्यावर उपाय यांचे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले.

पांडुकशिला व सजावटीच्या माध्यमातून ‘सदाचार, संयम आणि नियमित साधना यांद्वारे मुक्तीचा मार्ग’ अधोरेखित करण्यात आला. मुलींनीदेखील बारा भावनांचे उत्कृष्ट चित्रीकरण करून जीवन सुधारण्यासाठी प्रभावी संदेश दिला. या माध्यमातून जैन तत्वज्ञानातील आत्मशुद्धी आणि आचरणातील सातत्य यांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यात आले.

यावेळी प.पू. १०८ धवलसागरजी महाराज यांनी वालचंद शिक्षण समूहाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी आशीर्वाद दिला, तर प.पू. १०८ मंथनसागरजी महाराज यांचेही सानिध्य लाभले. मुनिश्रींनी विद्यार्थ्यांना नियमित मंदिरात येऊन अभिषेक व साधना करण्याचे मार्गदर्शन केले.

अहिंसा, सदाचार आणि आत्मोन्नतीचा संदेश देणारा हा महोत्सव केवळ धार्मिक सोहळा न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि मूल्याधिष्ठित जीवनशैलीचा प्रेरणादायी दीपस्तंभ ठरला. समाजात सकारात्मकता, एकात्मता आणि आध्यात्मिक ऊर्जा जागवणारा हा उपक्रम वालचंद शिक्षण समूहाच्या संस्कारप्रधान परंपरेची साक्ष देणारा ठरला.

Post Views: 40
Previous Post

श्री 1008 भगवान महावीर यांचा 2625 वा जन्मकल्याणक महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

Next Post

संत सहयोगाने मुक्ती मार्ग प्राप्त होतो – ह.भ.प. मोहन कुरापाटी महाराज

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
संत सहयोगाने मुक्ती मार्ग प्राप्त होतो – ह.भ.प. मोहन कुरापाटी महाराज

संत सहयोगाने मुक्ती मार्ग प्राप्त होतो - ह.भ.प. मोहन कुरापाटी महाराज

ताज्या बातम्या

ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

September 4, 2026
ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

September 4, 2026
श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

September 4, 2026

सोलापूरसह राज्यभरात एकांकिका स्पर्धेचे बिगुल

September 4, 2026
बार्शीच्या विश्वेश देशपांडेची महाराष्ट्राच्या ज्युनियर फुटबॉल संघात निवड

बार्शीच्या विश्वेश देशपांडेची महाराष्ट्राच्या ज्युनियर फुटबॉल संघात निवड

September 4, 2026
आरटीओ परिसरातील वृक्षतोडीला उपमहापौर देवकर यांनी केला अटकाव 

आरटीओ परिसरातील वृक्षतोडीला उपमहापौर देवकर यांनी केला अटकाव 

September 4, 2026
आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव — डॉ. वीरभद्र दंडे

September 4, 2026
आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

September 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1162600

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!