Sunday, September 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तृतीयपंथीय आयुबच्या खुनातील आरोपींना सहा तासात केले अटक 

तरुण भारतbyतरुण भारत
December 29, 2025
in crime
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्यावतीने तृतीयपंथीय आयुब सय्यदच्या खुना च्या गुन्ह्यातील ०३ आरोपीस ०६ तासात जेरबंद करण्यात आले आहे. सोलापूर शहर पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दिनांक २६/१२/२०२५ रोजी रात्री १०:३० वा. ते दिनांक २७/१२/२०२५ रोजी दुपारी ०१:३० वा. अयुब हुसेन सय्यद तृतीयपंथी यांचा घर नं. २२६, पहिला मजला पेंढारी मस्जिदच्या पाठीमागे मुर्गी नाला उत्तर सदर बझार लष्कर या ठिकाणी अज्ञात इसमांनी कोणत्यातरी अज्ञात कारणाने खून केला होता. सदर बझार पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १०५४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) प्रमाणे दि. २७/१२/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट दिली. पोलीस आयुक्त सोलापूर शहर, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), पोलीस उप-आयुक्त गुन्हे/वि.शा. व सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्या बाबत योग्य त्या सूचना दिलेल्या होत्या.

गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शंकर धायगुडे, स.पो.नि. विजय पाटील, स.पो.नि. शैलेश खेडकर, स.पो.नि. दत्तात्रय काळे, पो. उपनि, मुकेश गायकवाड, ग्रेड पो. उपनि, शामकांत जाधव व त्यांचे पोलीस पथक तसेच सदर बझार पो.स्टे. कडील सपोनि सागर काटे व त्यांचे पोलीस पथक यांनी तांत्रिक माहितीचे आधारे व सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी करून नमूद गुन्हा हा ०३ इसमांनी मिळून केल्याची व सदरचे आरोपी हे लातूर जिल्ह्याचे दिशेने गेल्याचे खात्रीशीर दिसून आले.

दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हे शाखेचे व सदर बझार पो. स्टे कडील तपास पथके तात्काळ लातूरकडे रवाना होवून नमूद आरोपींची ओळख पटविली. लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथील पोलीसांची मदत घेवून आरोपी यशराज उत्तम कांबळे वय-२१ वर्षे व्यवसाय शिक्षण रा.बौध्द विहार जवळ, इंदिरा नगर लातूर आफताब इसाक शेख वय-२४ वर्षे व्यवसाय मजुरी, रा. कुंभारवाडी ता. रेणापूर जि. लातूर, वैभव गुरूनाथ पनगुले व्यवसाय शिक्षण रा.कुंभारवाडी ता. रेणापूर जि. लातूर यांना गोपनिय माहितीचे आधारे विवेकानंद चौक येथील पाण्याचे टाकी जवळील परिसर, लातूर येथून ताब्यात घेतले.

अधिक चौकशीमध्ये यातील आरोपी क्रमांक आफताब इसाक शेख व मयत अयुब हुसेन सय्यद हे यापूर्वीपासूनच ओळखीचे असून आफताब शेख हा मयत अयुब सय्यद यास भेटण्याकरीता वारंवार सोलापूर येथे येत होता. आफताब शेख यास अयुब याचेकडे भरपूर प्रमाणात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असल्याची माहिती होती. तिन्ही आरोपी मयत अयुब सय्यद यास भेटण्याचा बहाणा करून मयताकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरण्याचे उद्देशाने आरोपी यशराज कांबळे याचेकडील युनिकॉर्न मोटार सायकल वरून सोलापूर येथे आले होते. तिन्ही आरोपींनी मिळून अयुबचा त्याचे राहते घरी खून करून घरातील सोन्या सारखे दिसणारे दागिने, रोख रक्कम व मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली. तसेच खून करून जातेवेळी त्या तिघांनी मयताची यामाहा स्कूटी ही मोटार सायकल चोरून घेवून गेले होते.

हा गंभीर गुन्हा गुन्हे शाखेकडील व सदर बझार पो.स्टे. कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक तपासाच्या आधारे ०६ तासाच्या आत उघडकीस आणला. पुढील तपास पो.नि. भालचंद्र ढवळे सदर बझार पो.स्टे. हे करीत असून आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी अटक करून त्यांना मा. न्यायालयानी दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, विजय कबाडे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), राजन माने, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, दिलीप पवार, सहा. पोलीस आयुक्त विभाग-२, यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, स.पो.नि.शंकर धायगुडे, स.पो.नि.विजय पाटील, स.पो.नि. शैलेश खेडकर, स.पो.नि. दत्तात्रय काळे, पो. उपनि. मुकेश गायकवाड, ग्रेड पो. उपनि. शामकांत जाधव व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, बापू साठे, अंकुश भोसले, संदिप जावळे, जावेद जमादार, अनिल जाधव, विनोद रजपूत, महेश शिंदे, वाजीद पटेल, योगेश बर्डे, शैलेश बुगड, काशिनाथ वाघे, राजकुमार वाघमारे, आबाजी सावळे, संजय साळुंखे, कुमार शेळके, अभिजित धायगुडे, राजकुमार पवार, इम्रान जमादार, धिरज सातपुते, अजिंक्य माने, सैपन सय्यद, सुभाष मुंडे, वसिम शेख, राजु भुदगल, महेश पाटील, महेश रोकडे, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, चालक सतिश काटे, बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस ठाणे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिद्र राठोड तसेच सदर बझार पो.स्टे. कडील व.पो.नि. नामदेव बंडगर, पोनि श्री ढवळे, स.पो.नि. सागर काटे व पोलीस पथक यांनी केली आहे.

Post Views: 85
Previous Post

सांगोल्याच्या प्रिया गायीला पुसेगावात हिंदकेसरी किताब

Next Post

सांगोलच्या जनतेने मला कधीच शून्य होऊ दिले नाही- माजी आ.शहाजीबापू पाटील 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सांगोलच्या जनतेने मला कधीच शून्य होऊ दिले नाही- माजी आ.शहाजीबापू पाटील 

ताज्या बातम्या

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

बार्शीतील दोघांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

September 19, 2026
श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

September 19, 2026
 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

September 19, 2026

बार्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना तातडीची मदत व कर्जमाफी द्या, शिवसेनेची मागणी

September 19, 2026

गौरी गणपती आरासमध्ये लावले पोलीसांच्या कार्याचे संदेश देणारे फलक

September 19, 2026
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1236468

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!