Saturday, June 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विधानपरिषद निवडणूकीच्या आखाड्यात भाजपाकडून परिचारकांनाच उतरविले जाणार

तरुण भारतbyतरुण भारत
May 22, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – सोलापूर जिल्हास्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा माजीआमदार प्रशांत परिचारक यांनाच निवडणूकीच्या आखाड्यातउतरविले जाण्याचा विश्वास परिचारक समर्थक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. कारणभाजपा हा शिस्तप्रिय पक्ष आहे. त्यामुळे भाजपा मध्ये ज्या मतदार संघात भाजपाचा जो उमेदवारप्रतिनिधीत्व करीत असतो त्याच्याचा नावाचा पुन्हा निवडणूकीत उमेदवारी देताना पहिल्यांदाविचार केला जात असतो. त्यामुळे सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातूनयावेळेला भाजपाकडून उमेदवार म्हणून प्रशांत परिचारकांनाच पुन्हा एकदा संधी दिली जाण्याचाविश्वास परिचारक समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.
——————-
चौकट : ( अनिल
सावंतांची देखील लढण्याची तयारी ) सोलापूर जिल्ह्यात भाजपचे संख्याबळ पाहता या जागेसाठी अनेकजण इच्छुक दिसत आहेत.तर दुसरीकडे भाजपच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी त्यांच्या मित्रपक्षांसह महाविकास आघाडीकडूनही पडद्यामागून काही हालचाली सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. येथून भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत हेनिवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याचे समजते. ते माजी मंत्री व शिंदे शिवसेनेचेनेते डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत. अनिलसावंत यांचे मोहिते पाटील तसेच अभिजीत पाटील आदींसह भाजपामधील काहीजणां बरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
—————
चौकट: ( मित्रपक्षांची भूमिका देखीलअसणार महत्वाची )
महायुतीचे संख्याबळ पाहता येथील विधानपरिषद निवडणूक ही भाजपसाठी अत्यंत सोपी आहे. भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणुकीत मिळविलेले घवघवीत यश पाहता जिल्ह्याचा आमदार याच पक्षाचा होणा रहे निश्चित मानले जात आहे. मात्र, याच जिल्ह्यात भाजपने ऑपरेशन लोटस राबविताना नगरपरिषद, महापालिका व पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत मित्रपक्षांनाही सोडले नाही. अनेक ठिकाणी तर शिंदे शिवसेनेबरोबर त्यांच्या लढती झाल्या आहेत. यामुळे आता विधान परिषदनिवडणुकीत मित्रपक्ष कोणती भूमिका घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
——————-
 चौकट : (काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकापची ताकद असताना परिचारक झाले होते विजयी)
२०१६ मध्ये प्रशांत परिचारक ह ेमहायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते. भाजप व मित्रपक्षाची कमीमते असतानाही परिचारक विजयी झाले होते. स्व.सुधाकरपंत परिचारक यांचा करिष्मा त्यावेळी जिल्ह्यानी अनुभवला होता. (कै.)पंतांच्या शब्दाला जिल्ह्याच्या राजकारणात असणारा मान त्यावेळी पाहावयास मिळाला होता. वास्तविक पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप यापक्षांची जिल्ह्यात त्यावेळी ताकद मोठी असतानाही प्रशांत परिचारक आमदार म्हणून निवडले गेले होते. अनेक अदृश्य शक्तींनी त्यांना साथ केली होती. त्यामुळेच काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शेकापचीजिल्ह्यात ताकद असताना परिचारकांनी विजयश्री खेचून आणली होती.
—————-
चौकट : ( जिल्ह्यात पहिल्यांदा परिचारकांचा भाजपाशी दोस्ताना )  २०१४ पूर्वीपासून परिचारक यांनी राष्ट्रवादी पासून फारकत घेत देवेंद्र फडणवीस यांची साथ केली व सोलापूर जिल्ह्यात भाजपचा विस्तार केला तसेच येथे राजकीय बस्तान बसविण्यासाठी मदत केली. अनेक नेत्यांना भाजपच्या जवळ आणले. त्यामुळे जिल्ह्यात भाजपाचे बस्तान बसविताना परिचारकांची चांगलीच साथ भाजपाला झाल्याचे भाजपाचे वरिष्ठनेते देखील खासगीत सांगताना ऐकावयास मिळतात. ————————
चौकट : ( भाजपाकडून उमेदवारीबाबत परिचारकांना शब्द )
२०२४ मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, आमदार समाधान आवताडे हे २०२१ ला विजयी झाल्याने सहाजिकच त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. तेव्हा परिचारक यांना विधानपरिषद दिली जाईल, असे सांगितले जात होते. नुकत्याच विधानपरिषदेच्या नऊ जागा भरल्या गेल्या आहेत, त्यावेळीही परिचारक यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून संधी मिळेल, असे आश्वासन भाजपाच्या वरिष्ठांनी दिल्याचे परिचारकांचे समर्थक सांगतात. दरम्यान, सध्या भाजपमध्ये अनेक मातब्बर गट आले असून सर्वांनाच विधानपरिषदेची अपेक्षा आहे. मात्र, जिल्ह्यातभाजपचे अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या परिचारकांना संधी मिळेल असा विश्वास परिचारक समर्थकांना आहे.
——————–
चौकट : ( परिचारकांच्या जागेवर परिचारकांचा अधिकार )
विधानपरिषद निवडणूकीच्या आखाड्यात भाजपाकडून परिचारकांनाच उतरविले जाणारअसल्याचा विश्वास परिचारक समर्थकांना आहे. कारण भाजपाच्या धोरणा नुसार ज्या मतदार संघाचा जो आमदार असेल त्यालाच निवडणूकीसीठी उमेदवार म्हणून पहिली पसंती दिली जात असते. गेल्या निवडणूकीत भाजपाचे फारसे संख्याबळ नसताना जिल्ह्यात विरोधकांचा दबदबा असताना देखील परिचारकांनी विजयश्री खेचून आणलेली होती.  भाजपा हा शब्द पाळणारा पक्ष आहे. तो काम करणाऱ्या नेत्याच्या, कार्यकर्त्यांच्या पाठीशी कायमच राहिलेला आहे. त्यामुळे परिचारकांच्या कामाची त्यांच्या त्यागाची या पक्षाकडून निश्चितच दखल घेतली जाईल. त्यामुळे परिचारकांच्या जागेवर परिचारकांचाच हक्क असल्याचा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे.
———————
चौकट : ( विधानपरिषदेसाठी जिल्ह्यात असे आहे  एकंदर संख्याबळ )
सोलापूर जिल्ह्यात विधानपरिषदेसाठी ५०१ मतदार असून यापैकी २६२
हे भाजपचे आहेत.तर महाविकास आघाडीचे संख्याबळ हे ७० इतके असून महायुतीमधील घटकपक्ष असणाऱ्या शिंदेशिवसेनेचे ७१ तर अजितदादा पवार राष्ट्रवादीचे ४७ सदस्य आहेत. यामुळे ही निवडणूकभाजपसाठी सोपी मानली जात असली तरी अन्य पक्षांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे.
Post Views: 34
Previous Post

रद्दी विक्रीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

Next Post

विश्वेश्वर एम्पॉवरमेंट ऑर्गनायझेशनतर्फे बसव उद्योजक पुरस्कारांचे वितरण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विश्वेश्वर एम्पॉवरमेंट ऑर्गनायझेशनतर्फे बसव उद्योजक पुरस्कारांचे वितरण

ताज्या बातम्या

चीन मध्ये कोळश्याच्या खाणीत स्फोट…९० कर्मचार्यांचा जागीच मृत्यू #viral #internationalnews

June 12, 2026
लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन

लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन

June 12, 2026

शेअर बाजारातील १ कोटी ८१ लाखांच्या नुकसानीतून उद्ध्वस्त झाला हसता-खेळता संसार!

June 12, 2026

शिव्या दिल्याचा जाब विचारल्याने तरुणास लोखंडी रॉड व लाथा बुक्याने मारहाण

June 12, 2026

शेतातील कचऱ्यापासून तयार नवीकरणीय डिझेलचा वाहनात यशस्वी प्रयोग

June 12, 2026

बुरलेवाडी येथील मजुराच्या मुलाची जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण झेप

June 12, 2026

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे 94 कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद

June 12, 2026

रोजगार, बेरोजगारी व असंघटित क्षेत्राची माहिती संकलित होणार

June 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0906956

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697