मोहोळ – सोलापूर जिल्ह्यासह राज्यात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोहोळ येथील ग्रामदैवत श्री नागनाथमहाराज यांच्या यात्रेला उद्या शुक्रवार (१७एप्रिल) पासून सुरुवात होणार आहे. तैलाभिषकाने सुरू होणाऱ्या यात्रेची २६ एप्रिल रोजी श्रींचे तेल उतरवून सांगता होणार आहे.यात्रा काळातप्रचंड उत्साहाने आसमंत दुमदुमूननिघणार आहे.
चैत्र अमावस्या दि. १७एप्रिल रोजी सकाळी श्रींना तेल लावून यात्रेस सुरुवात होणार आहे त्याचप्रमाणे रात्री वसंत पूजा गाभाऱ्यातील आरती चंदन उटी व प्रसाद असा कार्यक्रम होईल.शनिवार दि.१८ रोजी रात्री वसंतपूजा, गाभा-यातील आरती चंदन उटी, प्रसाद,होईल आणि प.पू.हेग्रस वंशज विनायकराव तथा अरुणबुवा मोहोळकर यांचे प्रवचन होणार आहे. रविवार दि. १९ रोजी वैशाख शुक्ल अक्षय्यतृतीया दिवशी श्री रघुनाथ बुवा रचित सोमनाथ बुवा बबनबुवा कुर्डे महाराज यांचे चक्रीभजन, रात्री १ वाजता श्री क्षेत्र वडवळहून श्रींच्या छत्रीचे आगमन होऊन पहाटे ४ वाजता *श्रींची खर्गासह सवाद्य मिरवणूक व *दिल्ली दरवाज्यात* भाकणूक होणार आहे. दि. २० आणि २१ एप्रिल रोजी वसंत पूजा बाहेरील आरती चंदन उटी व प्रसाद होईल. दि. २२ एप्रिल रोजी श्री भिकलींग महाराजांचा अभिषेक भिकलिंग महाराजांची गुरू शिष्य यांची भेट, श्रींची सवाद्य मिरवणूक व रात्री शोभेचे दारुकाम होईल. *दि. २३ एप्रिल रोजी सकाळी श्रींची पूजा व दुपारी ४ वाजता श्रींच्या पालखीची गणासह सवाद्य मिरवणूक व भाकणूक होईल*. शुक्रवारी २४ एप्रिल रोजी सकाळी कलगीतुरे व दुपारी ४ वाजता कुस्त्याचे मैदान तर सायंकाळी ६ वाजता श्रींच्या छत्रीचे वडवळकडे प्रस्थान होईल. रविवारी २६ एप्रिल रोजी सकाळी श्रींचे तेल उतरविण्याच्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे.
यात्रेवर सीसीटीव्हीची नजर
श्री. नागनाथ महाराजांच्या यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून श्री .नागनाथ देवस्थान पंच कमिटीच्यावतीने यात्रा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देशमुख आणि पंच कमिटीच्या वतीने देण्यात आली.


























