मोहोळ – सहकारातून समृद्धीकडे व विज्ञानाकडे नेणारी आधुनिकतेचा स्वीकार करणारी ही संस्था असूनया संस्थेने गोरख चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अध्यात्माची जोड दिलेली आहे . राम कृष्ण हरी हे स्वागताचे वाक्य म्हणणारी महाराष्ट्रातील नव्हे भारतातील पहिली संस्था आहे. अर्थकारणाबरोबरच समाज प्रबोधन करत असल्याचे गौरवोद्गार मोहोळ चे माजी आमदार आणि राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी काढले.शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई संस्थेच्या सोलापूर विभागातील मोहोळ शाखेचे उदघाटन त्यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मोहोळच्या युवा नगराध्यक्ष कु. सिद्धी वस्त्रे,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुकुंद पवार, युवा नेते सोमेश क्षीरसागर, भाजपाचे जिल्हा चिटणीस आणि मोहोळ विधानसभा प्रमुख महेश सोवनी, भाजपा अनुसूचित मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष छगन बापू अष्टूळ,सुरेश भाऊ तोगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आनंदी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख चव्हाण होते.
राजन पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये शिवकृपा ही सहकारातील आदर्श व अग्रगण्य संस्था असून संस्थेची कामगिरी कौतुकास्पद आहे असे गौरव उद्गार काढले.
यावेळी मनोगत व्यक्त करतान सोलापूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था .मुकुंद पवार यांनी संस्थेच्या वाटचालीचे कौतुक केले. ते म्हणाले की संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष गोरख चव्हाण हे निस्वार्थी, कल्पक, दूरदृष्टी असलेले, सतत कामाचा ध्यास असलेले, आधुनिकतेचा ध्यास व कार्यतत्परता कर्तव्यदक्ष उत्तम प्रशासक असलेले नेतृत्व असून त्यांनी संस्थेस दिलेली अध्यात्माची जोड संस्थेमध्ये राबवलेली ध्येय धोरणे यामुळे महाराष्ट्रातील आदर्श व अग्रगण्य संस्था असून त्यांचे सहकारातील काम उत्तुंग आहे संस्थेची एकूण संपत्तीक स्थिती ठेवी येणे कर्ज कर्जाबाबतची धोरणे अत्यंत कमी असलेला एनपीए संस्थेची असणारी गुंतवणूक या बाबीचा विचार करता संस्था मजबूत स्थितीमध्ये आहे तसेच ही संस्था राजकारण विहिरीत असून आदर्श जिल्ह्यातील इतर संस्थांनी घ्यावा कसे आवाहन केले
समारंभ अध्यक्ष तसेच संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री गोरख चव्हाण यांनी प्रास्ताविक पर मनोगत करताना संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा सादर केला . संस्थेने आज पर्यंत पाहिलेले चढ-उतर व अनुभव सांगितले .
संस्थेच्या आजमितीस महाराष्ट्रामध्ये १ प्रशासकीय कार्यालय ३ क्षेत्रीय कार्यालय १३विभागीय कार्यालय व १२२शाखा कार्यरत आहेत. एकूण ११०० कर्मचारी १३00 दैनंदिन ठेव संकलन प्रतिनिधी असे एकूण २४00 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे . निकोप सहकार पारदर्शक कारभार सहकार्याला अध्यात्माची व आधुनिकतेची जोड विज्ञान तंत्रज्ञान यांचा स्वीकार प्रशिक्षित कर्मचारी व प्रतिनिधी कार्यतत्पर सेवा यामुळे संस्थेने आज अखेर ठेवी ३६०० कोटी तर कर्ज २७ ००कोटी असा ६ हजार ३००कोटीचा संमिश्र व्यवसाय पूर्ण केला आहे .
संस्थेच्या वाटचालीमध्ये सभासदांचे मोठे योगदान असून संस्था राबवत असलेले विविध उपक्रम संस्था करीत असलेले सामाजिक काम याबाबतची माहिती देऊन संस्थेत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन चा दीपस्तंभ पुरस्कार आदर्श पतसंस्था पुरस्कार असे एकूण २३ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
मोहोळ शाखेमुळे या भागातील सभासदांना अधिक चांगली व तत्पर सुविधा उपलब्ध होतील
मोहोळकरवाशी यांनी संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार करण्याचे आवाहन केले
कु. सिद्धी राजू वस्त्रे नगराध्यक्ष मोहोळ नगरपरिषद यांनीही संस्थेच्या कार्याचे कौतुक करून संस्थेत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले
यावेळी कार्यालयात श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केलेली होती या सोहळ्याप्रसंगी संस्थेच्या सभासद ठेवीदार हितचिंतक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.संस्थेचे संचालक शिरीष देशमुख, बाळासाहेब मोहिते,राजेंद्र पवार, सुरेश संकपाळ, संतोष चव्हाण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यलक्षी संचालक राजेश शेटे तसेच कर्मचारी प्रतिनिधी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामदास कर्णे क्षत्रिय अधिकारी निलेश वीर यांच्या समवेत संस्थेच्या सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक ज्ञानेश्वर बांदल तसेच कर्मचारीवृंद व दैनंदिन ठेव संकलन प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन पुणे विभागाचे क्षेत्रीय अधिकारी निलेश वीर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात व सांगता प्रार्थना व पसायदानाने करण्यात आली.
Post Views: 78