पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव परीसरावर यंदाच्या गौरी – गणपती सणावर महागाईचे मोठे सावट आहे. साखर, खाद्यतेल, गॅस, कांदा यासह दैनंदिन वापरात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या तसेच खाद्यपदार्थाच्या किमतीत तसेच गौरी _ गणपतीसह सजावटीसाठी आवश्यक असणारे डेकोरेशनचे साहित्याच्या दरात यंदा प्रचंड मोठी वाढ झाली आहे. यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदा खरेदीसाठी फारसा उस्हा दिसुन येत नाही.साखरेचा दर सध्या 55 रु प्रती किलो एवढा आहे. यामुळे खाद्य पदार्थाच्या किमतीत पेढा, बर्फी, लाडु, यासह साखर असणाऱ्या सर्वच खाद्य पदार्थाच्या किमतीत यंदा मोठी वाढ झाली आहे. साखर, गुळ, खाद्य तेल, गॅस याच्या दरात वाढ झाल्यामुळे खाद्य पदार्थाच्या किमतीत 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ _ सोयाबीन तेल 172 रु किलो, शेंगदाणा तेल 190 रु, मोहरी तेल 200 रु प्रती किलो एवढी प्रचंड मोठी दरात वाढ झाली आहे. सुकामेवाचया दरात तसेच पेढा ,खव्याच्या दरात, सर्व प्रकारच्या लाडुच्या दरासुदधा मोठी वाढ झाली आहे. डेकोरेशनचया साहीत्यात मोठी वाढ_ गौरी गणपतीच्या सजावटीसाठी आधुनिक पदधतीचे डेकोरेशन यामध्ये आकर्षक कागदी मंदीरे, एल ईडी लाईट, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीकल वस्तु, कागदी मंदीरे, ऐतिहासिक व शिवकालीन प्रतिकृतीच्या दरात सुमारे यंदापासून तिस टक्क्यांपर्यंत दरवाढ झाली आहे .गौरी गणपतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच वस्तु व पदार्थांच्या दरात यंदा प्रचंड मोठी दरवाढ आहे. यंदाच्या गौरी गणपतीच्या सणावर एकतर दुष्काळाचे सावट आहे यातच महागाईमुळे अक्षरश सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक कुटुंबासमोर महागाईमुळे सण कसा साजरा करावयाचा हा गहन प्रश्न उभा आहे.





















