सांगोला – फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथील इलेक्ट्रिकल विभागातील शुभम वानखंडे, प्रथमेश जाधव आणि निलेश लोंढे या विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे अदानी ग्रीन एनर्जी कंपनीत निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे यांनी दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपनीत स्थान मिळवून फॅबटेक महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाची साक्ष दिली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.धनंजय शिवपुजे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ.संपतकुमार बोडापटला यांनी अभिनंदन केले.