सोलापूर – बरूर येथील पाच वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याच्या खूनामुळे संपूर्ण परिसर हादरला असताना, मंद्रूप पोलिसांनी विलक्षण तत्परता, तांत्रिक कौशल्य आणि धाडसी तपासाच्या जोरावर केवळ दोन तासात खुनाचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या कामगिरीमुळे मंद्रूप पोलिसांचे कौतुक होत आहे.
६ जून रोजी समर्थ कास्तार , वय ५ वर्षे या चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मंद्रूप पोलिसांना मिळताच पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. मंद्रुप पोलीसांनी सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान समर्थला अंकुश परशराम कास्तार (वय २५ वर्षे, रा. हलसंगी, ता. तडी, जि. विजयपूर, कर्नाटक) याच्यासोबत पाहिल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक माहिती, स्थानिक माहितीदार आणि गोपनीय यंत्रणेच्या मदतीने आरोपीचा माग काढला. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशी केली असता आरोपीने चिमुकल्या समर्थचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.
अत्यंत गंभीर, संवेदनशील आणि जनमानसाला अस्वस्थ करणाऱ्या या गुन्ह्याची अवघ्या दोन तासांत उकल करून आरोपीला अटक करणे ही मंद्रूप पोलिसांच्या तपास कौशल्याची आणि सजगतेची प्रचिती देणारी कामगिरी ठरली आहे.
आरोपी यास न्यायालयाने दिनांक 11 जून पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ही
कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप काशीद, सहायक फौजदार बापू शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीराम आदलिंग, कॉन्स्टेबल लखन पवार , माजिद शेख, अश्फाक मियावाले, किरण तोडेकर, चालक पोलीस कॉन्स्टेबल श्रीशैल शिवणे तसेच बरूर गावचे पोलीस पाटील श्रीशैल स्वामी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
निष्पाप चिमुकल्याला न्याय मिळवून देण्यासाठी मंद्रूप पोलिसांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि तपासाचे कौतुक होत आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















