अकलूज – महाराष्ट्र शासनाने प्रवासी वाहतुकीची सेवा देणाऱ्या चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केलेली आहे.या मंडळाचे सभासद असलेल्या आणि १ जानेवारी २०२६ रोजी वयाची ६५ वर्ष पूर्ण केलेल्या चालकांना अकलूज उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील दोन निवृत्ती चालकांचा सन्मान योजना अंतर्गत दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पुढाकाराने सभासद नोंदणी झालेल्या शिवाजी कृष्णात चव्हाण,मधुकर पांडुरंग पोरे या दोन ज्येष्ठ चालकांना या योजनेचा लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे.१७ सप्टेंबर रोजी चालक दिनाचे औचित्य साधून या दोन जेष्ठ सन्माननीय चालकांचा अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे, अश्विनकुमार पोंदकुले,भाग्यश्री शेंडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी लाळगे आदी उपस्थित होते.
प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या चालकांनी कल्याणकारी मंडळा अंतर्गत जास्तीत जास्त नोंदणी करून मंडळाकडून प्रदान करण्यात येणाऱ्या योजनांचा संपूर्ण लाभ घ्यावा.असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी केले आहे.
Post Views: 10