Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दगडाने डोके ठेचून तरुणाचा खून

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 12, 2024
in top news
0
दगडाने डोके ठेचून तरुणाचा खून
0
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दगडाने डोके ठेचून तरुणाचा खून
संजय निकम
वाळूज महानगर ( त.भा.): डोक्यात दगड मारून तरुणाचा खून केल्याची घटना वडगाव परिसरात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या साईनगर सिडको ते वडगाव गट नंबरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर, खदानीलगत अंदाजे ३० ते ३५ वर्षीय तरुणाचा रक्ताने माखलेल्या अवस्थेतील मृतदेह सकाळी सात वाजेच्या कारखान्यात शिफ्टसाठी पायी जाणाऱ्या महिलांच्या निदर्शनास आला. घाबरलेल्या महिलांनी फोनकरून ही माहिती त्यांच्या पतीला दिली. बघता बघता माहिती सर्वत्र पसरल्याने सकाळी आठवाजेपर्यंत घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, फौजदार संदीप शिंदे विशेष शाखेचे योगेश शेळके, डिबी पथकाचे विलास वैष्णव आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. मारेकऱ्याने वडगाव गट नंबरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दगडाने ठेचून खून करत मृतदेह लगतच्या खदान परिसरात फेकून पळ काढला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. विशेष म्हणजे पोलिसांना घटनास्थळावरून मयताची चप्पल जोड व सोबत रक्ताने मखलेली मारेकऱ्याची चप्पल देखील आढळून आली. घटनास्थळी श्वानाला पाचरण करण्यात आले होते. श्वान लगतच्या दगडाच्या ढिगाऱ्या भोवती आणि नंतर मृतदेह परिसरातच घुटमळत होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

घटनास्थळी वडिलांचा आक्रोश
मृतदेहाजवळ कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे किंवा मोबाईल आढळून आला नाही. यामुळे ओळख पटविण्यात अडचण आली. मृताच्या उजव्या हातावर ‘आई’ असे नाव गोंदलेले दिसून आले. पोलिसांनी सरपंच सुनील काळे व इतर स्थानिकांना बोलावून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. दरम्यान, मृताच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे मृताच्या वडिलांनी मुलाचा मृतदेह असल्याचे सांगत एकाच आक्रोश केला. यावेळी कामगार नेते अशोक निकम यांनी कुटुंबियांचे सांत्वन करत धीर दिला. मृताचे नाव शैलेश विठ्ठल दौंड असे असून तो बजाजनगर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळी बघ्यांची गर्दी
खून झाल्याची माहिती संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे घटना स्थळी शेकडो बघ्यांची जमली होती. पोलीसांना यामुळे तपास कामांत अडथळा निर्माण होत असल्याने शेवटी पोलीसांना गर्दी पांगवावी लागली.
गर्दुल्यांचा अड्डा
या मार्गावर जवळपास अर्धा किलोमीटर परिसरात कुठेही लाईट नाही. याचा फायदा घेत अनेक गर्दुले या ठिकाणी ठाण मांडून असतात. या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत याठिकाणी दारू विक्रीचा व्यवसाय एका लोखंडी टपरीतून केला जातो. दारू पिण्यावरून अथवा दारूच्या नशेत हा प्रकार घडला असल्याची शंका नागरिक व्यक्त करीत होते.

Post Views: 30
Previous Post

केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टातून अंतरिम जामीन मंजूर

Next Post

वाशी तालुक्यातील शेतकरी पी.एम.किसान योजनेपासून वंचित!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
वाशी तालुक्यातील शेतकरी पी.एम.किसान योजनेपासून वंचित!

वाशी तालुक्यातील शेतकरी पी.एम.किसान योजनेपासून वंचित!

ताज्या बातम्या

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

सिव्हिल पाच मयत गळफास दोन , एक्सीडेंट एक

May 30, 2026
एसकेएन सिंहगडच्या विद्यार्थिनीचे जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश

एसकेएन सिंहगडच्या विद्यार्थिनीचे जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश

May 30, 2026
मालवंडी रस्त्यावरील सर्वे रस्ता खुला; तहसीलदार  शेख यांच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये समाधान

मालवंडी रस्त्यावरील सर्वे रस्ता खुला; तहसीलदार  शेख यांच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये समाधान

May 30, 2026
श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे मातोश्री रमाईंना अभिवादन

श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे मातोश्री रमाईंना अभिवादन

May 30, 2026
राज्य शासनाच्या मोडीलिपी अभ्यासक समितीवर तानाजी मोळक यांची नियुक्ती 

राज्य शासनाच्या मोडीलिपी अभ्यासक समितीवर तानाजी मोळक यांची नियुक्ती 

May 30, 2026
माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमातूनजीवनाला ऑक्सिजन मिळतो– प्रा.वैशाली घोंगडे

माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमातूनजीवनाला ऑक्सिजन मिळतो– प्रा.वैशाली घोंगडे

May 30, 2026
खो-खो स्पर्धेत रत्नागिरीने पुण्याला रोखले; राज्य निमंत्रित महिला कबड्डी व खो-खो स्पर्धा 

खो-खो स्पर्धेत रत्नागिरीने पुण्याला रोखले; राज्य निमंत्रित महिला कबड्डी व खो-खो स्पर्धा 

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886190

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697