सोलापूर:- शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा, आणि उसाला यंदा वाढीव भाव मिळावे, त्याशिवाय साखर कारखाना सुरु करु नयेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी सोलापूरात भव्य मोर्चा काढून आंदोलन केले.
या आंदोलनास वाव (WoW) महिला संघटनेच्यावतीने विद्या लोलगे यांनी त्यांची समक्ष भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आणि तसे पत्रराजू शेट्टी व माजी मंत्री जानकर यांच्याकडे सोपविले.
यावेळी अफ्रिन पटेल, मोनिका सरकार, मदिना पटेल, स्वाती मुकणार, मार्था अlसादे, शारदा मसूती, शबाना मुलाणी , वैशाली देशपांडे आदी उपस्थित होते.




















