वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी विशाल मिसाळ तर महासचिवपदी पंडित घोरपडे
भोकरदन :वंचित बहुजन आघाडीच्या भोकरदन तालुकाध्यक्षपदी युवा नेते विशाल मिसाळ तर महासचिवपदी पंडितराव घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की,सदरील कार्यकारिणीत प्रत्येक गावातील किमान पाच कार्यकर्त्यांचा समावेश करावा तसेच संपूर्ण तालुक्यातील गाव, शहर,गट व वॉर्ड साठी देखील नावे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात तात्काळ सादर करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, उर्वरीत कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी सुभाष सुरडकर,सचिव पदी राजपाल पारखे,संघटक पदी विजय सावंत, सह संघटकपदी पवन दाभाडे,सहसचिव पदी अशोक खरात,सदस्य पदी सर्वश्री-आनंद पगारे, राजू बोर्डे,कचरू रामफळे,सुरेश खरात तर प्रसिद्धी प्रमुखपदी सुरेश बनकर यांची निवड करण्यात आली आहे.
नूतन कार्यकारिणीचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.