
माळशिरस . तालुक्यातील पठाणवस्ती,व जळभावी या दोन गावांतील १८ वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा केला जाणार असून पठाणवस्ती येथे टँकर सुरु करण्यात आला असून जळभावी येथे आज ४ जून रोजी सुरु होणार असल्याची माहिती पंचायत समितीचे पाणी पुरवठा उपअभियंता जे .व्ही सदावरे यांनी सांगितले .यावेळी शाखा अभियंता ,वरिष्ठ सहाय्यक एस .आर,करांडे आदी उपस्थित होते
पठाणवस्ती येथील गावठाण ,मगर वस्ती, खानवस्ती ,काळे माने वस्ती,वडवलेवस्ती,दबासे वस्ती,सरतापे वस्ती,पवार लोंढे वस्ती,लाडे मदने चोरमलेवस्ती,शेख सुळ तांबोळी वस्ती, वाघ सोनवणे अर्जुनवस्ती,पठाणसर ढोरकी,१२ वस्त्यावर १२ हजार ली क्षमतेच्या टँकरच्या चार खेपा दररोज करण्यात येणार आहेत
जळभावी येथील कोळेकर वस्ती,सुळ वस्ती,हिरवे वस्ती,शिंदे वस्ती,सरगर वस्ती,देशमुख वस्ती या सहा वस्त्यावर १२ हजार ली क्षमतेच्या टँकरच्या चार खेपा दररोज करण्यात येणार आहेत. जळभावी गावठाणात पाणी उपलब्ध आहे.
यापूर्वी पळसमंडळ, सुळेवाडी,पिंपरी,कदमवाडी,गारवाड,मगरवाडी या सहा ठिकाणी टँकर सुरू असून आता दोन टँकर असे आठ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.कोथळे व उंबरे दहीगाव या दोन गावाचे टँकर मागणी प्रस्ताव दाखल झाले आहेत.
Post Views: 19