बार्शी – गुरु या शब्दाचा अर्थच खूप मोठा आहे. जो आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो, तोच खरा गुरु! आई-वडील हे आपले पहिले गुरु होय. आपल्या आयुष्यात केवळ शाळेतील शिक्षकच नव्हे, तर आपल्याला चांगला मार्ग दाखवणारी प्रत्येक व्यक्ती, निसर्ग आणि आपले अनुभव हे देखील आपले गुरुच असतात, प्रतिपादन प्राचार्य जीवन लोखंडे यांनी केले. गुरु पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सोमनाथ देंडे होते.
अध्यापिका विद्यालय बार्शी येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सरस्वतीच्या पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उंबरे, बुराडे, क्षीरसागर, मगर व चव्हाण यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कु. पल्लवी गिराम यांनी केले. गुरुपौर्णिमेनिमित्ताने प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी कु. प्रतिक्षा जाधव, कु. सानिका मगर, कु. मेहेक बागलकोटे, कु. सीमा सोनवणे, कु. अनुजा बोराडे, कु. मनीषा उंबरे, कु. साक्षी थोरात, कु. आकांक्षा कातुरे, कु. मधुरा बेले, कु. आहेरकर पूजा, कु. तेजल जाधवर, कु. संजीवनी गोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर प्रमुख पाहुणे प्रा. सोमनाथ देंडे, प्रा. सुभाष माळी, प्रा. प्रमोद मांडे, प्रा. रातिकांत हामणे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार कु प्रगती सुदामे यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुसया कदम व प्राची सुदामे यांनी केले.
Post Views: 9