भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे गंठण लंपास

बार्शी – शहरात भररस्त्यात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याच्या घटना पुन्हा एकदा समोर येऊ लागल्या असून, ऐनापुर मारुती मंदिर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. १२ जून रोजी फिर्यादी महिला आपल्या आई व मुलीसह घरगुती साहित्य खरेदीसाठी पायी जात असताना ही घटना घडली. संध्याकाळी ७.३४ च्या सुमारास त्या ऐनापुर मारुती मंदिर परिसरात पोहोचल्या असता, मागून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण जोरात हिसकावून घेतले आणि क्षणार्धात घटनास्थळावरुन पसार झाले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला घाबरून गेल्या असून त्यांनी आरडाओरडा केला. या झटापटीत त्यांच्या गळ्याला किरकोळ दुखापतही झाली. घटनेनंतर परिसरात आणि रस्त्याच्या बाजूला शोधाशोध करण्यात आली, मात्र चोरीस गेलेले दागिने अथवा आरोपींबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
चोरीस गेलेल्या दागिन्यामध्ये अंदाजे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण असल्याचे फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
घटनेची माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तसेच आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु केले आहे.
शहरात वाढत्या साखळी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करून आरोपींना तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Next Post

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!