Monday, May 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ज्येष्ठांचा आदर्श घेऊन तरुणांनी सायकलिंग कडे वळावे : आ रणजितसिंह मोहिते पाटील 

तरुण भारतbyतरुण भारत
April 6, 2026
in editor
0
ज्येष्ठांचा आदर्श घेऊन तरुणांनी सायकलिंग कडे वळावे : आ रणजितसिंह मोहिते पाटील 

Oplus_131072

0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माळशिरस – श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) या सायकल वारीच्या माध्यमातून आज आरोग्य उत्तम रहावे म्हणून ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात सायकलिंगकडे वळले आहेत ही अभिमानाची बाब आहे. या ज्येष्ठांचा आदर्श घेऊन तरुणांनी सायकलिंगकडे वळावे असे आवाहन आ रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले.

सायकल रायडर्स असोसिएशनच्या वतीने जागतिक आरोग्य दिन व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित अकलूज ते अकलूज या सुमारे ७५ किलोमीटर माळशिरस तालुका सायकल राईड चे आयोजन करण्यात आले होते. अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथून सकाळी ६ वाजता अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते या सायकल राईडचा शुभारंभ करण्यात आला. अकलूज – माळीनगर -२५/४ – महाळुंग – श्रीपूर – बोरगाव – माळखांबी – बोंडले – वेळापूर – खुडूस – माळशिरस – संग्रामनगर – अकलूज असा या सायकल राईडचा मार्ग होता .

माळशिरस येथे पंचायत समिती सभागृहात सभापती दत्ताभैय्या मगर यांनी सायकल रायडर्सचे स्वागत केले. त्याप्रसंगी आयोजित समारंभात आ मोहिते पाटील बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, सभापती दत्ताभैय्या मगर , इशिता मोहिते पाटील, गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी सायकलिंग काळाची गरज या विषयावर आंतरराष्ट्रीय सायकल रायडर्स सतीश जाधव (मुंबई) यांचे व्याख्यान झाले. ते 

म्हणाले , सायकल राईड सारखे उपक्रम समाजात आरोग्य विषयी जागरूकता निर्माण करतात, एकत्रितपणे सकारात्मक ऊर्जा देतात आणि नव्या पिढीला योग्य दिशा दाखवतात. घुमाण सायकल वारीने आरोग्य संपन्न वारीचा नवा आदर्श घालून दिला आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील म्हणाले , सायकलिंगला अनन्य साधारण महत्व आहे. पूर्वी गरिबीमुळे सायकलीने प्रवास करावा लागत होता. आज आरोग्य उत्तम रहावे म्हणून सायकलिंग करावी लागत आहे ही चांगली बाब आहे. 

अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते व अकलूजचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहभागी सायकल रायडर्सना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . 

या राईडचे आयोजन सायकल रायडर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत भिसे, उपाध्यक्ष डॉ सुभाष कोकणे, सचिव सुरेंद्र पिसे, सह सचिव सुधाकर सोनवणे, विश्वस्त हर्षल सरोदे यांनी केले होते.

 

सायकल राईडचे ठिकठिकाणी उत्साही स्वागत 

सायकल रायडर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या अकलूज ते अकलूज या सुमारे ७५ किलोमीटर सायकल राईडचे श्रीपूर येथे श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या पांडुरंग सायकल क्लबने, बोंडले येथे डॉ जयंत चव्हाण, वेळापूर येथे रिपाइंचे तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी, खुडूस येथे माजी सभापती मच्छिंद्र ठवरे यांनी, चव्हाण वस्ती येथे संदीपान चव्हाण यांनी तर अकलूज येथे अकलूज नगर परिषदेच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

Post Views: 103
Previous Post

महादेव देवालय ट्रस्टतर्फे गजी ढोल कार्यक्रम; भाविकांना महाप्रसादाचे वाटप

Next Post

कॉईनडीसीएक्सकडून १०० कोटींच्या ‘डिजिटल सिक्युरिटी नेटवर्क’ची घोषणा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कॉईनडीसीएक्सकडून १०० कोटींच्या ‘डिजिटल सिक्युरिटी नेटवर्क’ची घोषणा

कॉईनडीसीएक्सकडून १०० कोटींच्या ‘डिजिटल सिक्युरिटी नेटवर्क’ची घोषणा

ताज्या बातम्या

पालकांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधावा – प्रशांत माने

May 25, 2026

हम कमिशनर है म्हणणाऱ्या रीलवाल्याचा पोलिसांनी उतरवला माज

May 24, 2026

आरक्षणावर सडेतोड बोलले ओबीसी नेते हाके

May 24, 2026

नाभिक समाजाच्या पुढाकारातून दोन गरीब दाम्पत्याच्या जुळल्या रेशीमगाठी

May 23, 2026

निकाळजेंच्या घरी सांत्वनासाठी पोहोचल्या खा प्रणिती शिंदे

May 23, 2026

श्री शक्ती सेवा समिती सोलापूरच्या वतीने ऐश्वर्या लक्ष्मी सुवर्ण कुबेर महोत्सवात सुवासिनींने केले पूज

May 23, 2026

काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचे निधन

May 23, 2026

अप्रिय घटना नको, त्वरित पोलिसांना संपर्क साधा ईदसाठी सूचना

May 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0877727

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697