वेळापूर – येथील ग्रामदैवत अर्धनारी नटेश्वर महोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महादेव देवालय ट्रस्ट, वेळापूर यांच्या वतीने गजी ढोल कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.
अर्धनारी नटेश्वराच्या साडेच्या कार्यक्रमाच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या या गजी ढोल कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला. ढोल-ताशांच्या गजरात परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. सकाळी महाप्रसादाचा नैवेद्य आराध्य दैवत अर्धनारी नटेश्वरला मदनसिंह माने देशमुख यांनी अर्पण केला व त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास पांडुरंगभाऊ माने देशमुख , महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमृतराज माने देशमुख, योद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मदनसिंह माने देशमुख, संदीप तात्या माने देशमुख, भैय्या मिरगे, अशोक माने देशमुख, पिनूभाऊ येडगे, दत्तात्रय माळी, ओंकार खराडे, निखिल शिंदे , प्रकाश माने, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

















