बार्शी – तालुक्यातील कांदलगाव येथील शुभम रामदास मुकटे (वय २९) या तरुणाचा अज्ञात कारणातून गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना १३ सप्टेंबरच्या रात्री ते १४ सप्टेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
शुभम मुकटे यांनी घरात अज्ञात कारणातून गळफास घेतल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर त्यांना मृतावस्थेत ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे दाखल करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून शुभम मुकटे यांना मृत घोषित केले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृत्यूबाबतचा अहवाल तहसीलदार, बार्शी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. तपास बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक चौधरी करीत आहेत.