Saturday, August 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या बैठकीत 20 देशांचे मंत्री, 116 सदस्य आणि स्वाक्षरीदार देशांचे प्रतिनिधी सहभागी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 1, 2023
in india
0
आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या बैठकीत 20 देशांचे मंत्री, 116 सदस्य आणि स्वाक्षरीदार देशांचे प्रतिनिधी सहभागी
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची सहावी बैठक मंगळवारी केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 20 देशांचे मंत्री आणि 116 सदस्य आणि स्वाक्षरीदार देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

 

बैठकीला संबोधित करताना, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सदस्य देशांना सौर ऊर्जा हा उर्जेचा पर्याय बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे. “जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे 80 टक्के लोकसंख्या, एकूण 6 अब्ज लोक जीवाश्म इंधनाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांमध्ये राहतात. नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांमध्ये 2030 पर्यंत जगातील एकूण विजेच्या 65 टक्के आणि 2050 पर्यंत ऊर्जा क्षेत्राचा 90 टक्के कार्बन उत्सर्जन कमी करण्याची क्षमता आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सदस्य देशांना सौर ऊर्जा हा उर्जा स्त्रोत म्हणून निवडण्याच्या, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पोषक वातावरण आणि वाढत्या जागतिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी उर्जा उपलब्धता सुनिश्चित करण्याप्रति आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे.”

 

सदस्य देशांच्या मंत्र्यांसह संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना सिंह यांनी माहिती दिली की आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या 6 व्या बैठकीने प्रकल्पांसाठी व्हाएबिलिटी गॅप फंडिंग 10% वरून 35% पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. “आंतरराष्ट्रीय सौर आघाडीकडे यासाठी एक कार्यक्रम आहे जेणेकरून विकसनशील देशांमधील प्रकल्पांसाठी व्हाएबिलिटी गॅप फंडिंग उपलब्ध होईल.” या व्यवस्थेअंतर्गत प्रदान केलेले अनुदान 150,000 अमेरिकी डॉलर्स किंवा प्रकल्प खर्चाच्या 10% (जे कमी असेल), ते प्रति देश प्रति प्रकल्प आहे. “आज, आम्ही निर्णय घेतला की देशाची आणि त्यांच्या संबंधित प्रकल्पांची क्षमता आणि गरजा लक्षात घेऊन आम्ही प्रकल्प खर्चाच्या 10% वरून 35% पर्यंत व्हाएबिलिटी गॅप फंडिंग वाढवू. यामुळे आफ्रिकेत अधिक गुंतवणूक येऊ शकेल.”

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या चार प्रकल्पांचे उद्घाटन आजच्या बैठकीत केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

हे प्रकल्प आहेत:

मलावीच्या संसद भवनात सौर ऊर्जेचा पुरवठा

फिजी मधील दोन ग्रामीण आरोग्य सेवा केंद्रांना सौर ऊर्जेचा पुरवठा, प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी 8-किलोवॅट सोलर पीव्ही प्रणाली आणि 20-किलोवॅट बॅटरी साठवण क्षमता

सेशेल्स मधील ला डिग्यू बेट येथे कृषी भागधारकांच्या हितासाठी 5 मेट्रिक टन क्षमतेचे सौर उर्जेवर चालणारे 1 शीतगृह स्थापित करणे

 

किरिबातीमधील नवाई कनिष्ठ माध्यमिक शाळेला (जेएसएस) सौर ऊर्जेचा पुरवठा, 7 किलोवॅट सोलर पीव्ही रूफटॉप प्रणाली आणि 24-किलोवॅट BSS सह प्रकल्प समर्पित करताना, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षांनी सौरऊर्जेद्वारे ऊर्जा संक्रमणाचा उद्देश सफल करण्यासाठी आयएसए सदस्य देशांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

 

सिंह यांनी आयएसएच्या क्षमता बांधणी उपक्रमांचा उल्लेख केला आणि प्रसारमाध्यमांना माहिती दिली की संस्था अपेक्षित परिणाम देत आहे. “संस्थेने कौशल्य, सहयोग आणि प्रशिक्षण समर्थन प्रदान केले आहे. संपूर्ण आफ्रिकेत प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.” कमी विकसित देश (एलडीसी) आणि लहान बेटांची विकसनशील राज्ये (एसआयडीएस) यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मे 2020 मध्ये प्रात्यक्षिक प्रकल्प सुरू करण्याच्या आयएसए च्या उपक्रमाचा हे प्रकल्प एक भाग आहेत. व्याप्ती वाढवता येणाऱ्या सौर तंत्रज्ञान अनुप्रयोगांचे प्रदर्शन करणे आणि लाभार्थी सदस्य देशांची क्षमता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे.

 

केंद्रीय मंत्री म्हणाले की, ऊर्जा संक्रमण आणि ऊर्जा उपलब्धतेस मदत करण्याच्या दुहेरी उद्दिष्टांच्या पूर्ततेत आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जगाच्या भल्यासाठी एक शक्ती म्हणून उदयास आली आहे. “जग जागतिक तापमानवाढीचे आव्हान स्वीकारत असताना आयएसए ही सर्वात महत्वाची संघटना आहे. आज आमच्याकडे 120 सदस्य देश आहेत आणि इतर अनेक देश आहेत ज्यांनी आयएसए आराखडा करारावर स्वाक्षरी केली आहे आणि लवकरच ते मंजूर करणार आहोत. आयएसए ही एक मोठी संघटना असल्याचे नमूद करून मंत्री म्हणाले की, तिच्या अनेक भागीदार संस्था देखील आहेत.

 

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षांनी असेही सांगितले की या परिषदेत भारताने अवलंब केलेली ऊर्जा उपलब्धता आणि ऊर्जा संक्रमण पद्धती विकसनशील देशांमध्ये कशाप्रकारे लागू करता येतील यावर चर्चा केली. “केवळ सार्वजनिक गुंतवणुकीसह, आपण विजेचा सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करू शकत नाही. खाजगी गुंतवणूक येण्यासाठी आपण गुंतवणुकीतील जोखीम कमी करणे आवश्यक आहे. म्हणूनच, खाजगी गुंतवणूक आकृष्ट करण्यासाठी आज आम्ही तंत्रज्ञान-नियामक चौकट, विवाद निपटारा यंत्रणा आणि देयक सुरक्षा यंत्रणा या संदर्भात आम्ही भारतात जे काही केले आहे त्याची इतर देशांमध्ये पुनरावृत्ती कशी करता येईल यावरही चर्चा केली. यासाठी आयएसए ने एक निधी स्थापन केला आहे, ज्यामध्ये विमा आणि देयक सुरक्षा यंत्रणा घटक आहेत. या यंत्रणांमुळे, आफ्रिकेत गुंतवणुकीचा ओघ सुरू होईल, विशेषत: ज्या देशांमध्ये त्यांच्या सर्व लोकांपर्यंत ऊर्जा उपलब्ध होण्यात समस्या आहे, अशा देशांत गुंतवणूक सुरू होईल याची आम्हाला खात्री आहे.”

 

विकसित देशांनी त्यांच्या कॉप 21 वचनबद्धतेनुसार हरित निधीची तरतूद करण्याचे महत्त्व मंत्र्यांनी अधोरेखित केले. “आम्ही स्थापन करत असलेल्या निधीतून हरित निधी उपलब्ध होईल अशी आमची अपेक्षा आहे. कॉप21 मध्ये विकसित देशांनी केलेल्या वचनबद्धतेनुसार हरित निधीचा प्रवाह सुरू होताच, ज्या देशांमध्ये ऊर्जा उपलब्धतेची समस्या आहे अशा सर्व देशांमध्ये आम्ही अक्षय ऊर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबवू.”

Post Views: 162
Previous Post

दिल्लीत धार्मिक स्थळांजवळ मांस विक्रीस बंदी

Next Post

देशात 2022 च्या वर्षात 4,61,312 रस्ते अपघातात 1,68,491 व्यक्तींचा मृत्यू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
देशात 2022 च्या वर्षात 4,61,312 रस्ते अपघातात 1,68,491 व्यक्तींचा मृत्यू

देशात 2022 च्या वर्षात 4,61,312 रस्ते अपघातात 1,68,491 व्यक्तींचा मृत्यू

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्याला मिळाले शासकीय रेखाकला परीक्षेचे मूल्यमापन केंद्र

August 21, 2026
घरामागे गांजाची लागवड; १० किलो गांजा जप्त

घरामागे गांजाची लागवड; १० किलो गांजा जप्त

August 21, 2026

अभय योजनेत ८५५ गाळेधारकांना ५८.८३ लाखांची दंडमाफी

August 21, 2026

चांदापुरी येथील शेतकरी ग्रामीण पतसंस्थेच्या वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना 13 सायकलचे वाटप

August 21, 2026

राखी पाठविण्यासाठी पंढरपूर पोस्ट कार्यालया मध्ये आकर्षक पाकिटे उपलब्ध

August 21, 2026
‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त  ‘ज्येष्ठ नागरिक आदरभाव’ परिसंवाद  ज्ञानसत्र संपन्न

‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त  ‘ज्येष्ठ नागरिक आदरभाव’ परिसंवाद  ज्ञानसत्र संपन्न

August 21, 2026
सोलापूरात ‘महावॉकेथॉन’ मध्ये 5 हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग  

सोलापूरात ‘महावॉकेथॉन’ मध्ये 5 हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग  

August 21, 2026
लोकप्रतिनधींचा विकासनिधी रोखून जनतेला वेठीस धरणे थांबवा-हेमंत पाटील

लोकप्रतिनधींचा विकासनिधी रोखून जनतेला वेठीस धरणे थांबवा-हेमंत पाटील

August 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1100340

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!