सांगोला – शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शायना एन.सी यांनी मुंबई मध्ये सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या निषेधावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला. याबद्दल सांगोल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवार दि.१९ नोव्हेंबर रोजी जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी शायना एन.सी यांच्यावरती महापुरुषाचा अपमान केला म्हणून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी रघुनाथ गायकवाड, शंकर मेटकरी, तुषार इंगळे, अमर साळुंखे, नवल गाडे, सागर भादुले, रघुनाथ ऐवळे, समाधान चव्हाण, संतोष टाकळे, सचिन सुरवसे, संतोष वसमळे, सुशील गवळी, देशमुख उपस्थित होते.
Views: 11