बार्शी – प्रबुद्ध भारत चारिटेबल ट्रस्ट अंतर्गत श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे समाजात कुशल कर्म करणाऱ्या सेवाभावी संस्थेचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेचा सन्मान खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे तसेच ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू कांबळे व टी एस मोरे यांच्या हस्ते समाजसेवक पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे सदस्य गणेश सातारकर यांनी स्वीकारला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी, सचिव अजय तिवारी, सहसचिव नागनाथ सोनवणे, खजिनदार माणकोजी ताकभाते, सुनील फल्ले, सुरेंद्र स्वामी, सायरा मुल्ला, सुनिता गायकवाड हे उपस्थित होते. अध्यक्ष राहुल वाणी यांनी हा पुरस्कार आपल्या संस्थेस समाजसेवेसाठी मिळाला असला तरी खरा अर्थाने या पुरस्काराचे मानकरी संस्थेस बार्शीतील दानशूर व्यक्ती, मित्र परिवार, संस्थेतील सदस्य तसेच नाव न टाकणाऱ्या अटीवर जे आर्थिक स्वरुपात मदत करतात त्यांचा हा सन्मान आहे. तेव्हा हा सन्मान मी सर्व बार्शीकरांना समर्पित करतो, अशी बोलकी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी, माता रमाई महिला मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी जो पुरस्कार आम्हाला दिला त्याबद्दल तसेच या सन्मान सोहळ्यासाठी संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित राहिल्याबद्दल अध्यक्ष राहुल वाणी यांनी आभार मानले.
Post Views: 8