Thursday, September 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

देशातील 75 ऐतिहासिक दीपगृहांना प्रमुख पर्यटन स्थळे होणार विकसित…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 25, 2023
in maharashtra
0
देशातील 75 ऐतिहासिक दीपगृहांना प्रमुख पर्यटन स्थळे होणार विकसित…..
0
SHARES
63
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते पणजीतील ऐतिहासिक अग्वादा किल्ल्यावर देशातल्या पहिल्या भारतीय प्रकाशस्तंभ उत्सवाचे उद्घाटन झाले. भारतातील 75 महत्वपूर्ण ऐतिहासिक दीपगृहांचा समृद्ध सागरी इतिहास पुनरुज्जीवित करण्याच्या तसेच या दीपगृहांशी संबंधित कथा जगासमोर आणण्याच्या हेतूने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पहिल्या वहिल्या उत्सवाचे प्रमुख स्थळ, अग्वादा फोर्ट इथे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी, जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खौंटे, आमदार मायकेल लोबो यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “या उत्सवाचे उद्घाटन करुन, आपण भारताच्या विशाल किनारपट्टीवर असलेल्या प्राचीन दीपगृहांचे पुनरुज्जीवन करणार असून, ही सर्व स्थळे आपला ऐतिहासिक वारसा सांगणारी पर्यटन स्थळे म्हणून विकसित केली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली आपण आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करत आहोत. राष्ट्रबांधणीच्या या पवित्र कार्यात, आम्ही पंतप्रधान मोदी यांचा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचाच भाग म्हणून ही दीपगृहे, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्रे म्हणून महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या या वैशिष्ट्यपूर्ण दीपगृहांचे अत्यंत सुरेख अशा वारसा पर्यटन स्थळांमध्ये रूपांतर केले. अनेक काळोख्या रात्री कित्येक खलाशांना आणि जहाजांना आशेचा किरण आणि दिशा दाखवणाऱ्या या किनारपट्टीवरील मूक संरक्षकांकडे आजवर दुर्लक्ष केले गेले. ते बदलण्याचा आमचा प्रयत्न म्हणजेच हा “दीपस्तंभ महोत्सव” आहे. आपल्या देशाच्या इतिहासात या ऐतिहासिक दीपस्तंभांनी जी महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्याबद्दल आपणा सर्वांना माहिती देणे, त्याकडे लोकांना आकर्षित करणे आणि त्यांना इतिहासाची जाणीव करून देणे, हे आमचे ध्येय आहे.”

सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून ऐतिहासिक स्थळे जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळांच्या रूपात विकसित करण्याच्या उद्देशाने,भारतीय दीपगृह महोत्सवाचे आयोजन, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने केले आहे. दीपगृह आणि दीपनौका (लाइटशिप्स) महासंचालनालयाने यापूर्वीच अशी 75 दीपगृहे महोत्सवासाठी निश्चित केली आहेत आणि हा महोत्सव म्हणजे आपला सागरी वारसा साजरा आणि जतन करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले, “हा “दीपगृह महोत्सव” , गतकाळाचा सौंदर्यपूर्वक मनमोहक प्रवास उलगडणारा एक भव्य उत्सव आहे, एक असा प्रवास जो आपल्या सागरी इतिहासात दडलेली व्यक्तिमत्त्वे आणि आपल्या ऐतिहासिक दीपगृहांच्या कधीही पुढे न आलेल्या कथा प्रकाशात आणतो. रिफॉर्म टू ट्रान्सफॉर्म (सुधारणांमधून परिवर्तन) उपक्रमाचा एक भाग म्हणून, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने, भारतातील सागरी नेव्हिगेशनला पूरक ठरणाऱ्या विकास, देखभाल आणि व्यवस्थापनासाठी एक आराखडा प्रदान करण्याकरता, दीपगृह कायदा, 1927 रद्द करून मरीन एड्स टू नेव्हिगेशन अॅक्ट, 2021 हा सागरी मार्गक्रमणेसाठी सहाय्यभूत ठरणारा कायदा लागू केला. या अंतर्गत सरकारने, हेरिटेज लाइटहाऊसची (दीपगृह वारसा) नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केली ज्याद्वारे केंद्र सरकार, आपल्या नियंत्रणाखालील नेव्हिगेशनसाठी कोणतीही मदत, हेरिटेज लाइटहाऊसच्या माध्यमातून उपलब्ध करू शकते. नेव्हिगेशनसाठी सहाय्यकारक म्हणून त्यांच्या कार्याव्यतिरिक्त, अशी दीपगृहे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यटन हेतूंसाठी विकसित केली जातील. हा महोत्सव केवळ ज्ञानाचा नाही, तर मूल्य आणि संधी निर्मिती करण्याबद्दल आहे. महोत्सवाच्याही पुढे जाऊन, दीपगृहांना पर्यटन स्थळे म्हणून चालना देणे, या ऐतिहासिक वास्तूंमध्ये नवे प्राण फुंकणे आणि स्थानिक समाज आणि व्यवसायांसाठी संधी निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे”असे मंत्री म्हणाले.

दिवसभर चाललेल्या कार्यक्रमादरम्यान, भारत प्रवाह या इन्स्टिट्यूट फॉर गव्हर्नन्स, पॉलिसी अँड पॉलिटिक्सच्या पुढाकाराने आयोजित ‘व्हॅनगार्ड्स ऑफ अवर शोर्स: लाइटहाऊसेस अॅज टेस्टामेंट्स ऑफ इंडियाज पास्ट अँड प्रेझेंट’ या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात राखीगढी फेम प्रसिद्ध इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ प्रा. वसंत शिंदे यांनी भारताच्या सागरी इतिहासातील दीपगृहांचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले. डॉ सुनील गुप्ता, सागरी पुरातत्वशास्त्रज्ञ आणि OSD, प्रधानमंत्री संग्रहालय, नवी दिल्ली आणि गोवा राज्य संग्रहालयाचे संचालक डॉ. वासू उसपाकर यांनीही या सत्रात भाषण केले. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांनी दीपगृह वारसा पर्यटन विकासाबाबत असलेला मंत्रालयाचा दृष्टिकोन आणि या टप्प्यातील 75 दीपगृहांमधील गुंतवणुकीच्या संधींचे सादरीकरण केले.

सांस्कृतिक प्रदर्शने, सागरी इतिहास आणि संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणारी सत्रे, शास्त्रीय आविष्कार, प्रकाश-ध्वनी खेळ , ख्यातनाम गायकांच्या गायनाने बहरलेली संगीतमय संध्याकाळ, मत्स्य पाककृती आणि स्थानिकांचा सहभाग ही भारताच्या पहिल्या दीपगृह महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

Post Views: 148
Previous Post

डोंबिवली, खोपोली, जुचंद्र, इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम उभारण्यासाठी मागवल्या निविदा

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले राज ठाकरे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले राज ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले राज ठाकरे

ताज्या बातम्या

सोलापुरात काँग्रेसनेत्याच्या नातवाने दिल्या मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा #viral #solapurnews #news

September 17, 2026

आंबेडकरांवरील वाक्य भोवले अखेर आमदार रमेश कदम यांच्यावर गुन्हा दाखल #viral #solapurnews #news

September 17, 2026

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात मंगळवारी पूजा

September 16, 2026
श्री चन्नय्या स्वामी मठात गुरुवार श्रावणमास समाप्ती

श्री चन्नय्या स्वामी मठात गुरुवार श्रावणमास समाप्ती

September 16, 2026
जमीयातुल हनफिया व रिजविया मदरसा येथे ईद मिलाद निमित्त विविध कार्यक्रम

जमीयातुल हनफिया व रिजविया मदरसा येथे ईद मिलाद निमित्त विविध कार्यक्रम

September 16, 2026
मुढवीत वाळू माफियांचा हैदोस! शेतकऱ्याची ४ जनावरे टिपरखाली चिरडली

मुढवीत वाळू माफियांचा हैदोस! शेतकऱ्याची ४ जनावरे टिपरखाली चिरडली

September 16, 2026
गणेशोत्सवानिमित्त वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेतून वैचारिक मेजवानी

गणेशोत्सवानिमित्त वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेतून वैचारिक मेजवानी

September 16, 2026
सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’ खेळाचा समावेश करा

सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’ खेळाचा समावेश करा

September 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1221855

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!