Saturday, July 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बंजारा समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – संजय राठोड

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 25, 2023
in maharashtra, political
0
बंजारा समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – संजय राठोड
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बंजारा समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी व उमरी येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विकास कामांना सुरुवात झाली आहे. या तीर्थक्षेत्राचा विकास करतांना बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.

पोहरादेवी येथे पोहरादेवी-उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पोहरादेवी विकास कामातील संत सेवालाल महाराज मंदिराची पायाभरणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री राठोड बोलत होते. बंजारा धर्मगुरू बाबुसिंग महाराज व कबीरदास महाराज यांच्या हस्ते मंदिराची पायाभरणी करण्यात आली.

पालकमंत्री राठोड म्हणाले की, मुंबई येथ बंजारा भवनासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी 3 एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. पोहरादेवीसाठी आज आनंदाचा क्षण आहे.आजच्या कार्यक्रमातून संत सेवालाल महाराज मंदिराची पायाभरणी करण्यात आली. उमरी येथे तीर्थक्षेत्र विकास कामांना सुरुवात झाली आहे.संत रामराव महाराजांचे स्वप्न होते की,पोहरादेवी-उमरी तीर्थक्षेत्राचा विकास झाला पाहिजे. तसेच राज्याच्या बाहेर असलेल्या बंजारा तीर्थक्षेत्राचा देखील विकास झाला पाहिजे.एवढंच नव्हे तर समाजाचा देखील विकास झाला पाहिजे हा संत रामराव महाराजांचा ध्यास होता.पोहरादेवी-उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे सुरू झाल्याने संत रामराव महाराजांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे ते म्हणाले.

भायागड,सेवागड व पोहरागड हा बंजारा तीर्थक्षेत्र कॅरीडॉर तयार झाला पाहिजे असे सांगून पालकमंत्री राठोड म्हणाले,बंजारा समाजाचे अनेक प्रश्न आहेत,त्याची सोडवणूक करण्यासाठी समाजातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे. बंजारा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला गती मिळणार आहे.सुरूवातीला 10 जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू होत आहे.मुलामुलींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळासाठी 1500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 700 कोटी रुपये तांडा वस्ती विकासासाठी शासनाने मंजूर केले आहे.वनार्टी ही स्वायत्त संस्था बार्टीच्या धर्तीवर सुरु करण्यात येणार आहे.पोहरादेवी किंवा मानोरा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

केवळ धार्मिक स्थळ म्हणून पोहरादेवीचा विकास न करता पर्यटन व शैक्षणिक विकासाला देखील गती देणार असल्याचे सांगून पालकमंत्री राठोड म्हणाले,इथल्या सामाजिक, कृषी व आरोग्य क्षेत्राकडे आपले लक्ष राहणार आहे.इथल्या विकासासाठी महंत सोबत आहे.समाज एकत्र असला की शक्ती निर्माण होते,ही शक्तीच समाजाचे प्रश सोडविण्याचे बळ देते.वसंतराव नाईक यांचे शिक्षण झालेल्या विठोली येथील शाळेच्या विकासाकडे लक्ष देणार असल्याचे राठोड यावेळी म्हणाले.

तर खासदार जाधव म्हणाले की,देशात विविध देवस्थानाच्या विकास होत असताना पालकमंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यात येत आहे.देशातील बंजारा समाज एकत्र आला पाहिजे.पोहरादेवी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सत्करमूर्ती माजी आमदार अनंतकुमार पाटील म्हणाले, बंजारा समाजाला पुर्वी स्वातंत्र्य नव्हते. स्वातंत्र्यानंतर या समाजात मोठा बदल झाला. समाजातील अंधश्रध्दा दूर करण्याचे काम जेतालाल महाराजांनी केले. भारतातील मंदिरे आपल्यासाठी बंद होते. पोहरादेवीचे मंदिर गेल्या 500 वर्षांपासून सर्वांसाठी खुले आहे. इतिहासात मोठे काम पोहरादेवीत झाले.आपल्याला अज्ञानाकडून विज्ञानाकडे जायचे आहे. वसंतराव नाईक,सुधाकरराव नाईक व संत रामराव महाराजांनी समाजाची प्रगती केली. पोहरादेवीत इंग्रजी शाळा व इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाले पाहिजे असे त्यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले.

Post Views: 96
Previous Post

‘रंगीले फंटर’ शाळकरी जीवनातली धमाल गोष्ट

Next Post

आरक्षणासाठी जनतेने आवाज उठवला पाहिजे – भुजबळ

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
आरक्षणासाठी जनतेने आवाज उठवला पाहिजे – भुजबळ

आरक्षणासाठी जनतेने आवाज उठवला पाहिजे - भुजबळ

ताज्या बातम्या

परकीय शक्तीला यश मिळू नये असे सांगत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा #viral #breakingnewstoday

July 25, 2026

उत्साहात निघाली शुभराय महाराज मठाची रथयात्रा

July 25, 2026

भवानी पेठेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा रेबीजमुळे मृत्यू #viral #marathinews #solapurnews

July 25, 2026

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा केली #viral

July 25, 2026
आमदार राऊत यांच्या वृक्षारोपण संकल्पात सुयश विद्यालयाच्या बालवारकऱ्यांचा खारीचा वाटा

आमदार राऊत यांच्या वृक्षारोपण संकल्पात सुयश विद्यालयाच्या बालवारकऱ्यांचा खारीचा वाटा

July 24, 2026

बुधवारी श्री.वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव

July 24, 2026
श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा  मानकरी  बीड चा अर्जुन रहाडे 

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा  मानकरी  बीड चा अर्जुन रहाडे 

July 24, 2026

उपवास’ महागला! बटाटा वेफर्स, साबुदाणा चिवड्याचे दर २४० रुपयांवर

July 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0998079

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!