सोलापूर : विभागीय कार्यालय क्रमांक एकच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग ५ येथे बाळे ब्रिज ते अंबिका नगरपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. परिसर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली.
या मोहिमेत प्रभाग ५ च्या नगरसेविका अलका भवर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वच्छता कामांची पाहणी केली. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक नरसिंह बच्चू, आरोग्य निरीक्षक सचिन वडवेराव, बसवराज जमादार, राहुल मस्के, सचिन कदम, सोमनाथ ताकभाते, पंकज क्षिरसागर तसेच प्रभागाचे जमादार तुकाराम काळे, अभिषेक डोळसे आणि स्वच्छता विभागातील सर्व सेवकवर्ग उपस्थित होता.
मोहिमेदरम्यान रस्ते, गटारे, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली.
नागरिकांनीही आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे आणि कचरा निर्धारित ठिकाणीच टाकावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.






















