धाराशिव – शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचे समर्थक दिवंगत शिवाजीराव शेळके यांच्या पत्नी पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे गुरुवारी (दि. २ जुलै) सायंकाळी सुमारे ५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने शेळके परिवारासह परिसरात शोककळा पसरली आहे.
पद्मिणी शेळके यांनी दोन वर्षांपूर्वीच देहदान व नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार पुत्र सुरेश शेळके व रमेश शेळके यांनी देहदानाची प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा देह धाराशिव जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाकडे वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी सुपूर्द केला.
दिवंगत शिवाजीराव शेळके यांनी आयुष्यभर पुरोगामी विचारांचा वारसा जपत सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत पद्मिणी शेळके यांनीही मृत्यूनंतर देहदानाचा संकल्प पूर्ण करून समाजापुढे प्रेरणादायी आदर्श ठेवला.
त्यांच्या पश्चात दोन मुले – सुरेश शेळके (सेवानिवृत्त वाहक), रमेश शेळके, दोन सुना, एक मुलगी तसेच सात नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Post Views: 20