बार्शी – बुधवार दि. १ जुलै रोजी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय, बार्शी येथे इयत्ता अकरावीच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत सकाळी शाळेच्या प्रांगणामध्ये प्राचार्य कविता धावणे व सर्व शिक्षकांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. प्राचार्य व सर्व शिक्षकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला विभाग प्रमुख प्रा. संजय बागल यांनी केले .सर्व शिक्षकांची ओळख प्राचार्य यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांना करुन देण्यात आली. प्राचार्य कविता धावणे यांनी आपल्या उद्बोधन पर अभिभाषणातून विद्यार्थ्यांना गुणवत्ता व शिस्त यांचे पालन करावे, मोठी स्वप्न उराशी बाळगून सतत यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, वेळेचा सदुपयोग करावा, विद्यालय तसेच संस्था आपल्याला कायम सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .ज्योती डमरे (रेवडकर) यांनी केले तर आभार प्रा .हरिश्चंद्र बेडकुते यांनी मानले.
Post Views: 20