सोलापूर – सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी ठरलेल्या सीए फाऊंडेशन – मे २०२६ परीक्षेत दिशा इन्स्टिट्यूटने घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थेचा विद्यार्थी प्रेम धनराज नोगजा याने ऑल इंडिया रँक (AIR) ४ मिळवत देशभरात चौथा क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे सोलापूरच्या शैक्षणिक गुणवत्तेची राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा प्रभावी नोंद झाली आहे.
देशपातळीवरील या यशामुळे दिशा इन्स्टिट्यूटच्या गुणवत्तापूर्ण अध्यापनाची, अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाची आणि विद्यार्थीकेंद्रित प्रशिक्षण पद्धतीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. संस्थेच्या या ऐतिहासिक यशाबद्दल विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यंदाच्या परीक्षेत दिशा इन्स्टिट्यूटच्या इतर विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश मिळवत संस्थेच्या निकालात भर घातली. तनिष्का कटवे यांनी ३२२ गुण, कौस्तुभ पाटील यांनी ३१० गुण, हिमांक केनिया यांनी २८८ गुण, संगमेश कलशेट्टी यांनी २५५ गुण, अथर्व निचल यांनी २५३ गुण, तर श्रावणी पुला यांनी २१४ गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली.
या ऐतिहासिक निकालानिमित्त दिशा इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. नंदा भट्टड यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. विद्यार्थ्यांची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास, पालकांचा विश्वास आणि शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश आहे. राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी घडविण्याचा आमचा संकल्प यापुढेही अधिक जोमाने सुरू राहील,” असे त्यांनी सांगितले.
डॉ. भट्टड यांनी विशेषतः प्रेम धनराज नोगजा याचे अभिनंदन करत त्याने दिशा इन्स्टिट्यूटवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असलेली क्षमता योग्य नियोजन, वैयक्तिक मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध तयारीच्या माध्यमातून सर्वोच्च यशात रूपांतरित करता येते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सीए फाऊंडेशन परीक्षेतील या ऐतिहासिक निकालामुळे दिशा इन्स्टिट्यूटने सोलापूरमध्ये वाणिज्य शिक्षणाच्या क्षेत्रातील आपले अग्रस्थान आणखी भक्कम केले असून, राष्ट्रीय स्तरावर गुणवंत चार्टर्ड अकाउंटंट घडविणाऱ्या संस्थांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या निकालाने सोलापूरच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एका सुवर्णपानाची भर पडली आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















