Thursday, May 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

यूपीएल एसएएसचा एनएसएल शुगर्सबरोबर सामंजस्य करार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 27, 2023
in maharashtra
0
यूपीएल एसएएसचा एनएसएल शुगर्सबरोबर सामंजस्य करार
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शाश्वत कृषी उत्पादने आणि उपाय पुरविणारी एक जागतिक स्तरावरील कंपनी, यूपीएल सस्टेनेबल अॅग्रिकल्चर सोल्युशन्स लिमिटेड (UPL SAS) ने ‘शेतकऱ्यांना प्राधान्य’ हा दृष्टिकोन समोर ठेऊन शाश्वत ऊस उत्पादनासाठी देशातील आघाडीच्या साखर उत्पादकांपैकी एक असलेल्या एनएसएल शुगर्स लिमिटेड (NSL Sugars Limited) सोबत सामंजस्य करार केला. नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून पर्यावरणपूरक व हरित शेतीला प्रोत्साहन देण्याचे या सहभागीदारीचे ध्येय आहे. एनएसएलसोबत केलेला हा सामंजस्य करार अप्रत्यक्षपणे तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमधील जवळपास ५०,००० लाभार्थींना जोडेल आणि याअंतर्गत सुमारे एक लाख एकर क्षेत्र येईल. यूपीएल एसएएस आणि एनएसएल शुगर्स यांच्यातील ही भागीदारी दोघांसाठी फायदेशीर आहे. यूपीएल एसएएसने या भागीदारीमुळे बाजारात प्रवेश मिळविला तर एनएसएल शुगर्सला ऊसाच्या शाश्वत शेतीचे फायदे मिळाले. शाश्वत व पर्यावरण पूरक साखर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसह साखर मूल्य साखळीच्या संपूर्ण परिसंस्थेसाठीच ही भागीदारी फायदेशीर आहे.

या भागीदारीचे प्राथमिक उद्दिष्ट प्रति एकर उत्पादनात किमान १५% वाढ म्हणजेच अंदाजे ५ मेट्रिक टन प्रति एकर उत्पादन करणे हे आहे. यामुळे शेतकऱ्यांना १२,००० ते १५,००० रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल. शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देत असतानाच शेतकऱ्यांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात घट करणे हे देखील या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. या एकत्रित प्रयत्नांमुळे अंदाजे ६ लाख लीटर पाणी आणि प्रति एकर ५० किलोग्रॅम युरियाची बचत होणे देखील अपेक्षित आहे. परिणामी पर्यावरणपूरक, हरित व शाश्वत शेती पद्धतींना चालना मिळेल आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी होतील.

ही भागीदारी यूपीएल एसएएसचा शाश्वत साखर उत्पादनासाठीचा कार्यक्रम –‘शाश्वत मिठास’ उपक्रमाचाच विस्तारीत कार्यक्रम म्हणून काम करेल. यापूर्वीही ‘शाश्वत मिठास’ उपक्रमाने महाराष्ट्रातील पुणे परिसरात जवळपास १०,००० एकर क्षेत्रामध्ये यशस्वीपणे कार्य करून लक्षणीय प्रगती केलेली आहे. तीन वर्षाच्या कालावधीमध्ये यूपीएल एसएएस आणि एनएसएल या उपक्रमाची टप्प्या टप्प्याने अंमलबजावणी करून या भागीदारीला वरच्या स्तरावर नेतील. पहिल्या वर्षात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ३०,००० एकर क्षेत्र व्यापले जाईल. नंतर हळूहळू व्याप्ती वाढवीत संपूर्ण कार्यक्षेत्राला समाविष्ट केले जाईल.

सुरुवातीच्या टप्प्यामधील ३०,००० एकर क्षेत्रावर या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात व लक्षणीय प्रभाव होईल अशी अपेक्षा आहे. यातून अंदाजे १८०० कोटी लीटर पाण्याची बचत होणे अपेक्षित असून ही बचत जवळपास ६ लाख लीटर प्रति एकर असेल. याशिवाय, एकूण १५०० मेट्रिक टन युरिया म्हणजेच प्रति एकर अंदाजे ५० किलोग्रॅम युरियाचा वापर कमी करण्याचे देखील या कार्यक्रमाचे ध्येय आहे, ज्यामुळे नायट्रस ऑक्साइड (GHG) उत्सर्जनात २५% नी घट होईल. नायट्रस ऑक्साइड (GHG) हे कार्बनडायऑक्साइडपेक्षा ३०० पट जास्त शक्तिशाली असते. यूपीएल आणि एनएसएल मधील ही भागीदारी ऊस लागवडीमध्ये शाश्वत पद्धतींच्या वापरासाठी त्यांची असलेली कटिबद्धता आणि संसाधनांचे संरक्षण व जतन करणे, पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करणे आणि शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देणे यांसाठी त्यांचे असणारे समर्पण दर्शविते.

यूपीएल लिमिटेड मध्ये जागतिक कॉर्पोरेट आणि इंडस्ट्री अफेअर्सचे अध्यक्ष श्री. सागर कौशिक म्हणाले, “शाश्वततेबाबतची आमची अढळ बांधिलकी आमच्या प्राधान्यक्रमामध्ये नेहमीच आघाडीवर आहे. आमच्या प्राथमिक व सर्वात महत्वाच्या भागधारकांच्या, म्हणजेच शेतकऱ्यांच्या, समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी आम्ही नेहमी समर्पित राहू. शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून शेती आणि पर्यावरण या दोहोंमध्ये समतोल साधण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. शाश्वत ऊस कार्यक्रमाची ओळख हा आमच्या एक व्यापक स्वप्नदृष्टीचा केवळ एक सुरुवातीचा टप्पा आहे. भविष्यात संपूर्ण अन्न मूल्य साखळीमध्ये शाश्वततेची व्याख्याच बदलण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यासाठी या अशा शाश्वत पद्धतींमध्ये वेगवेगळ्या पिकांचा समावेश करण्याचा आमचा निश्चय आहे.

यूपीएल एसएएस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष डोभाल म्हणाले, “आमच्या या भागीदारीतून शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करणे, पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कामी करणे, बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी उत्तम गुणवत्तेचे ऊस उपलब्ध करवून देणे हे आमचे ध्येय आहे. प्रोन्यूटिव्हा पॅकेज आणि क्रांतिकारी झेबा तंत्रज्ञान पिकाचे उत्पादन वाढविण्यात आणि मातीची गुणवत्ता व प्रत सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात व त्यामुळे ऊस तोडणी प्रक्रियेमध्ये पूर्णपणे परिवर्तन येईल. हे सर्वसमावेशक पॅकेज शेतकऱ्याला अनेक फायदे देते. उत्पादन वाढ आणि नफा याबरोबरच पर्यावरणीय शाश्वततेमध्ये देखील हे योगदान देते. यूपीएल एसएएस (UPL SAS) आणि एनएसएल (NSL) हे एकत्र येऊन ऊसाच्या क्षेत्रात शाश्वत प्रगती आणण्यासाठी नेतृत्व करत आहेत, जेणेकरून शेतकरी, पर्यावरण आणि संपूर्ण मूल्य साखळीलाच फायदा होईल.”

एनएसएल समूहाचे चेअरमन श्री. गोविंद राजुलू चिंताला म्हणाले, “मजबूत सहयोग आणि सहभाग यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहाय तितके सर्वोत्तम उपाय पुरविणे यासाठी एनएसएल समूहाचे सर्वाधिक प्रयत्न व समर्पण असते. आमचा ठाम विश्वास आहे की आमच्या शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी ज्या समस्यांना सामोरे जावे लागते त्या सोडविण्यासाठी शाश्वत शेतीचा स्वीकार करणे हे फार महत्त्वाचे आहे. पर्यावरणपूरक पद्धतींची अंमलबजावणी करून आमचे उद्दिष्ट ऊसाचे उत्पादन प्रति एकर जास्तीत जास्त वाढवणे हे आहे. ज्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचे उत्पादन सुढाऊन त्यांचे उत्पन्न वाढेल. आपल्या शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याच्या दृष्टीने आणि ऊसाच्या शेतीमध्ये एक भरभराटीचे व शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने ही भागीदारी म्हणजे एक महत्वाचे पाऊल आहे.”

बाजारपेठेतील ऊस पुरवठ्यातील कमतरतेच्या समस्येला सोडविण्यासाठी ही भागीदारी उद्योग क्षेत्रातील गरजांना सहाय्य करून पुरवठा साखळी स्थिर करत साखर कारखान्यांना पुरेश्या ऊसाची उपलब्धता सुनिश्चित करेल. शाश्वत व पर्यावरणपूरक ऊसाची लागवड व्हावी हे सुनिश्चित करण्यासाठी हा सामंजस्य करार शेतकऱ्यांना चांगल्या शेती पद्धती (गुड अॅग्रोनॉमीकल प्रॅक्टिसेस GAP), प्रोन्यूटिव्हाची अंमलबजावणी (संपूर्ण पीक संरक्षण आणि पोषण पॅकेज), लागवडीसंबंधित यांत्रिकीकरण, नांगरणीसाठी यंत्रे, बूम फवारणी यंत्रे, नर्चर.फार्म अॅप (Nurture.farm) च्या माध्यमातून विमा आणि तपासणी अशा प्रकारच्या अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रत्येक टप्प्यांमध्ये शाश्वत उपाययोजना पुरवेल.

Post Views: 76
Previous Post

मानद डॉक्टरेट जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री यांनी केला फडणवीस यांचा सत्कार

Next Post

क्लायमेट फंडिंगसाठी सीएसआर मॉडेलचा वापर – रामनाथ वैद्यनाथन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
क्लायमेट फंडिंगसाठी सीएसआर मॉडेलचा वापर – रामनाथ वैद्यनाथन

क्लायमेट फंडिंगसाठी सीएसआर मॉडेलचा वापर - रामनाथ वैद्यनाथन

ताज्या बातम्या

सभापती चाकोतेंनी डेन्मार्कमधून मोदींच्या चाहत्यांची क्लिप व्हायरल केली #viral

May 21, 2026

माझ्या लेकराला वाचवा हो म्हणत आईने फोडला टाहो #solapurnews #viral

May 21, 2026

एलपीजीला पार्याय ; बालाजी अमाईन्सचे डायमिथाईल इथर निर्मितीत पाहिले पाऊल #solapurnews #marathinews

May 21, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या ३० मे पासून सुरू होणाऱ्या प्राणांतिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव जाणार

May 20, 2026
स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या ‘त्या’ समाजसेवकाचा अनोखा सत्कार!

स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या ‘त्या’ समाजसेवकाचा अनोखा सत्कार!

May 20, 2026

शक्तीपीठ महामार्ग वेळापूर येथे समर्थनार्थ शेतकरी मेळावा

May 20, 2026

अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू; २१ मेपर्यंत पसंतीक्रम भरण्याची अंतिम मुदत

May 20, 2026

तीन महिन्यांपासून वेतन रखडले; दिव्यांग शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा आक्रोश

May 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0873527

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697