सोलापूर : ग्रीन पॅराडाईज रिसॉर्ट येथे २७ व २८ जून रोजी राष्ट्रीय योंगमुडो पंच परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत रुद्रशक्ती गुरुकुलच्या सहा विद्यार्थिनींनी नेत्रदीपक यश संपादन करत राष्ट्रीय पंच म्हणून पात्रता मिळवली आहे.
रुद्रशक्ती गुरुकुलचे मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्कीन यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थिनींनी परीक्षेची तयारी केली होती. राष्ट्रीय स्तरावरील या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांनी आपल्या क्रीडा कौशल्याची मोहोर उमटवली. या पंच परीक्षेत सोनाक्षी माडे, श्रद्धा सरवदे, अदिती नल्ला, बिंदूप्रिया कुने, जानवी म्हेत्रे आणि गौरी माळी या विद्यार्थिनी यशस्वी झाल्या.
या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे योंगमुडो असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष मास्टर रोहित नारकर, योंगमुडो असोसिएशन महाराष्ट्रचे सचिव नागेश शेट्टीकर आणि रुद्रशक्ती गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष योगीनाथ फुलारी यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






















