पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव परीसरात गेल्या दोन दिवसांपासून आद्रा नक्षत्राच्या पावसास सुरुवात झाली आहे .खरेतर पिलीव, बचेरी, शिंगोर्णी या भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे .यामुळे या भागातील शेतकरी पेरणी करण्याच्या तयारीत आहेत. माञ कुसमोड, सुळेवीडी, झिंजेवस्ती, चांदापुरी या भागात अद्यापही पेरणी योग्य पाऊस झाला नाही .या भागातील शेतकरी सध्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या काही ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी अजूनही पाऊस कमीच पडला आहे. पिलीवसह, गारवाड, बचेरी ,शिंगोर्णी याच गावात चांगला पाऊस झाला पिलीव परीसरातील बाकीच्या भागात अद्यापही पेरणी योग्य समाधानकारक पाऊस पडलाच नाही.तब्बल पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर कालपासून पावसाने हजेरी लावली आहे.यामुळे तापमानात बदल जाणवत असुन सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांना पोषक वातावरण तयार झाले आहे.माञ अद्यापही या भागातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.