Wednesday, July 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रोजगार मेळा युवा सक्षमीकरण, राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल – गडकरी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 28, 2023
in maharashtra
0
रोजगार मेळा युवा सक्षमीकरण, राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल – गडकरी
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सरकारी नोकरीत नव्यानं भर्ती होत असलेल्या देशातल्या 51 हजार उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वितरण केलं. नागपुरात हिंगणा स्थित केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मेन्स क्लब ग्रुप सेंटर इथं आयोजित रोजगार मेळाव्यात सुमारे 250 उमेदवारांना नियुक्तीपत्रं वितरण कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती पत्रांचे वितरण उमेदवारांना करण्यात आले.

रोजगार मेळावा हा रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची पंतप्रधानांची वचनबद्धता पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. रोजगार मेळा रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि युवा सक्षमीकरण आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल असे सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवनियुक्त उमेदवारांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लोकशाहीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या निवडणुकांच्या बंदोबस्तामध्ये, नैसर्गिक संकटाच्या काळी आपत्ती व्यवस्थापनामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा निमलष्करी शासकीय सेवेमध्ये जे नव्याने उमेदवार भरती झाले आहे त्यांना आपण हार्दिक शुभेच्छा देतो असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमात प्रशांत जांभुळकर, पुलिस उप महानिरीक्षक, ग्रुप केन्द्र, केन्द्रीय राखीव पोलीस बल, नागपुर .पी.एस. रणपिसे, भा.पो.से. पोलीस महानिरीक्षक, पश्चिम सेक्टर, मुंबई, आई. लोकेद्र सिंह, उप महानिरीक्षक, रेंज सीआरपीएफ नागपूर, डॉ. मनोज कुमार सिन्हा, उप महानिरीक्षक (चिकित्सा) सयुक्त अस्पताल, सीआरपीएफ नागपूर, जी.डी.पंढरीनाथ, कमाण्डेन्ट, समूह केंद्र, सीआरपीएफ, नागपूर आणि श्रीमती सियाम होई चिंग मेहरा, कमाण्डेन्ट 213 (महिला) बटालियन सीआरपीएफ त्यांच्या हस्तेही नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये CRPF, CISF, BSF, ITBP, SSB, AR, ब्यूरो ऑफ माइन्स अशा विविध विभागातील यशस्वी उमेदवार उपस्थित होते.

पुण्याजळील तळेगाव इथल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या केंद्रावरही आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या रोजगार मेळाव्यात एकंदर 271 जणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. केंद्रीय राखीव पोलीस दलासह सीमा सुरक्षा दल, भारत तिबेट सुरक्षा दल आणि सीमा सुरक्षा बल यासारख्या निमलष्करी दलातील नोकऱ्यांचा त्यात समावेश आहे. विकसित भारताचे अंतिम उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने आपले कर्तव्य आणि जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन डॉ. कराड यांनी यावेळी केले.

आगामी 25 वर्षांचा काळ हा भारताचा अमृत काळ असून या काळात देशाच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या तुमच्या सारख्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांना अमृत रक्षक म्हणून ओळखले जाणार असल्याचे प्रारंभीच स्पष्ट करून डॉ. कराड पुढे म्हणाले की, सरकारी कर्मचारी म्हणून काम करताना नागरिकांना योग्य त्या सेवा सुविधा पुरवतानाच देशाचा सन्मान वाढवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची राहणार आहे.

संरक्षण क्षेत्रात काम करताना या जबाबदारीचे भान अधिक ठेवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. प्रामुख्याने संरक्षण क्षेत्रात काम करताना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे, त्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. आपल्या कुटुंब आणि समाजाला पुढे नेतानाच देशाला पुढे नेण्याची जबाबदारी आपण प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठ पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.

Post Views: 114
Previous Post

राष्ट्रपतींनी केले दिवंगत एन.टी. रामाराव यांच्या स्मृती प्रीत्यर्थ विशेष नाणे प्रकाशित

Next Post

राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी – मुख्यमंत्री

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी – मुख्यमंत्री

राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी - मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

मनपाच्या सभेत अनंत जाधवानी अकुलवार यांना धारेवर धरले #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

खुशखबर जिल्हा रुग्णालयात कार्डियाक केअर युनिट सेवा……

July 21, 2026

‘एक विशेष बाब लिहून बी टू रद्दचा आदेश आला #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

वारी दरम्यान खासगी दवाखाने सुरू राहणार…… #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

राम मंदिर देणगीचे राजकारण करू नका #viral#nationalnews

July 21, 2026

*सावधान ही दृशे तुम्हाला विचलित करू शकतात* समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील तिघांसह सहाजण ठार

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0990827

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!